शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

मुरुमाची दरड कोसळून मजूर जखमी

By admin | Updated: May 1, 2015 00:48 IST

मुरुम उत्खनन करताना एका मजुरावर दरड कोसळली. यात तो गंभीर जखमी झाला.

तुमसर : मुरुम उत्खनन करताना एका मजुरावर दरड कोसळली. यात तो गंभीर जखमी झाला. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नागपूर येथे हलविण्यात आले. मजुराचे नाव भय्यालाल कोकुडे (४४) रा.देवसर्रा असे आहे.सकाळी भय्यालाल कोकुडे मुरुम उत्खनन करण्याकरिता मुरुम खाणीत गेला. मुरुम उत्खनन करताना एक मोठी मुरुमाची दरड त्याच्यावर कोसळली. यात त्याचा डाव पाय फ्रॅक्चर झाला. दरड मोठी असल्याने पोटाच्या आतील भागात मुका मार बसला. आत रक्तस्त्राव होण्याची शक्यता तुमसर येथील डॉक्टरांनी वर्तविली. सुमारे अर्धा ते पाऊण तास प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन बाळबुद्धे, शल्यचिक्तिसक डॉ.सार्वे, डॉ.चिंधालोरेसह इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून शर्थीचे प्रयत्न केले. परंतु पोटाच्या आतील भागात गंभीर इजा होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. पुढील उपचाराकरिता त्याला नागपूर येथे रेफर करण्यात आले.सोंड्या येथे शासन मान्यता प्राप्त मुरुमाची खदान आहे. भय्यालाल कोकुडे यांचा अपघात नेमक्या कोणत्या खदानीत झाला याची माहिती त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांनी दिली नाही. केवळ मुरुमाची दरड कोसळून अपघात झाला हे सांगितले.महसूल प्रशासनाला यासंदर्भात विचारले असता त्यांनी सोंड्या येथे शासनमान्य मुरुमाची खदान आहे असे सांगितले. अपघाताची माहिती नाही असे सांगितले. मुरुमाच्या खदानीत सुरक्षेच्या उपाययोजना आहे किंवा नाही याची खातरजमा महसूल प्रशासनाने करणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)