शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यातील नगरपरिषद शिक्षकांचे तीन महिन्यांपासून वेतन नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 18:28 IST

शिक्षकांवर उपासमारीची वेळ : शिक्षकांचा वाली कोण?

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील नगर परिषद शाळेतून सेवानिवृत्त झालेले १३७ शिक्षकांची पेन्शन, तसेच कार्यरत असलेल्या ३५ अशा १७२ प्राथमिक शिक्षकांचे गत तीन महिन्यांपासून वेतन झालेले नाही. नागपूर विभागातील सुमारे ४०० पेक्षा अधिक सेवानिवृत्त व कार्यरत शिक्षकांचे पगार अडले. त्यामुळे शिक्षकावर उपासमारीची वेळ आली आहे. नगर परिषद शिक्षकांचा वाली कोण? असा शिक्षकांनी प्रशासनाला सवाल केला आहे.

नागपूर विभागातील नगर परिषद, नगर पालिका, तसेच महानगरपालिकाअंतर्गत सुरु असलेल्या प्राथमिक शाळेतील सेवानिवृत्त शिक्षकांची पेन्शन, तसेच कार्यरत शिक्षकांचे दरमहा वेतन विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत अदा केले जाते. शिक्षक शालार्थ बनावट आयडी प्रकरणी हे कार्यालय चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहे.

आजपासून आंदोलनाला प्रारंभखासगी शाळेतील बनावट प्रकरणामुळे स्थानिक स्वराज्य संस्था शाळेतील शिक्षकांचे वेतन अडले. बुधवारी विदर्भ नगर परिषद शिक्षक संघाने नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन केले. या आंदोलनात एस. बी. रायकवार, ललिता रेल्वेवार, भावना राऊत, इंदिरा पडोळे, प्रकाश बामन, भास्कर उपरीकर, अविनाश गजबे, हर्षल नंदागवळी, एस. डी. मेंढे, आय. बी. पडोळे आदी शिक्षक उपस्थित होते.

"वेतनाअभावी गृहकर्जाचे हप्ते चुकले, तीन महिन्यांचे व्याज वाढले, एलआयसी, आयकर, तसेच इतर कपाती बंद झाल्या आहेत. नियमित पगार व्हावे, ही मागणी आहे."- हर्षल नंदागवळी, प्रभारी मुख्याध्यापक, बोस प्रा. शाळा, पवनी.

"मी ९२ वर्षांचा असून, शरीर थकले, नियमित औषधी लागतात. यासाठी पैशांची गरज असते. तीन महिने झाले पेन्शनच मिळाली नाही. जगावे की मरावे, अशी अवस्था आहे."- गोपाळराव माटूरकर, सेवानिवृत्त शिक्षक न. प. भंडारा.

 

टॅग्स :bhandara-acभंडाराTeacherशिक्षकzp schoolजिल्हा परिषद शाळा