शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

भंडारा येथे ओबीसी क्रांती मोर्चाचा ‘मूक मोर्चा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 00:49 IST

स्वातंत्र्याच्या सात दशकानंतर ओबीसी समाजाची दशा व दिशा बदललेली नाही. हा समाज अनुसूचित जाती व जमातीपेक्षाही मागासलेला आहे. परंतु या समाजाच्या उत्थानासाठी अजूनपर्यंत केंद्र शासनाने गंभीर पावले उचललेली नाहीत.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : राष्ट्रीय मागासवर्ग आयोग गठित करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : स्वातंत्र्याच्या सात दशकानंतर ओबीसी समाजाची दशा व दिशा बदललेली नाही. हा समाज अनुसूचित जाती व जमातीपेक्षाही मागासलेला आहे. परंतु या समाजाच्या उत्थानासाठी अजूनपर्यंत केंद्र शासनाने गंभीर पावले उचललेली नाहीत. परिणामी ओबीसींसाठी राष्ट्रीय मागासवर्ग आयोग गठित करुन अहवाल प्राप्त होईपर्यंत अन्य मागण्यांची पूर्तता करावी, अशी मागणी ओबीसी क्रांती मोर्चाने केली आहे.गुरुवारी दुपारी ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हा कचेरीवर मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रधानमंत्री यांच्या नावाने असलेले प्रमुख मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सोपविण्यात आले. यात ओबीसी समाजाला शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांमध्ये ५२ टक्के आरक्षण देण्यात यावे, संसदेने घटना दुरुस्ती करुन सुप्रीम कोर्टाने आरक्षणावर लावलेली ५० टक्क्याची मर्यादा काढण्यात यावी, ओबीसी मागासवर्गीय असल्यामुळे ओबीसी नागरिकांविरुद्ध अ‍ॅक्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करु नये, ओबीसी विद्यार्थ्यांना एससी, एसटी प्रमाणे सवलती देण्यात यावा, शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच शिष्यवृत्ती देण्यात यावी, ओबीसींकरिता केंद्रात व राज्यात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे, स्वयंरोजगार-लघुउद्योग करणाºया ओबीसींना ३६ टक्के सबसीडी देण्यात यावी, युपीएससी, एमपीएससी व अन्य स्पर्धा परीक्षांकरिता मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्र उघडण्यात यावी, ओबीसी शेतकºयांना शेतीचे अवजारे, बी-बियाणे व खतांचा मोफत पुरवठा करावा व ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.निवेदन देतेवेळी ओबीसी क्रांती मोर्च्याचे संजय मते, सुकराम देशकर, प्रमोद भांडारकर, शिशुपाल भुरे, उमेश मोहतुरे, सतीश सार्वे, जयश्री बोरकर, प्रविण उदापुरे, उर्मिला आगाशे, देवेंद्र गावंडे, सुभाष आजबले, अरुण भेदे, संजय लोंडेकर, बालु ठवकर, धनराज साठवणे, मयुर बिसेन, विकास मदनकर, प्रेमसागर गणविर, डॉ. विनोद भोयर, सचिन घनमारे, दिनेश नवखरे, शिवा गायधने, चेतन चेटुले, यशवंत भोयर, रजनिश मेश्राम, जयंत बोटकुले, अमोल चोपकर, विजय चटफ, मारोती राऊत आदी उपस्थित होते.ओबीसी क्रांती मोर्चा संघटनेची स्थापनाओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी भंडारा येथे ओबीसी क्रांती मोर्चा संघटनेची स्थापना करण्यात आली. लवकरच राज्यातील सर्व जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामस्तरावर कार्यकारिणी गठीत करण्यात येईल असे संयोजक संजय मते यांनी सांगितले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीOBCअन्य मागासवर्गीय जाती