शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

चिखलमय पांदण रस्त्यामुळे शेतकऱ्यांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 06:00 IST

रस्त्याबाबत शेतकऱ्यांनी अनेकदा लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला तरी हे आश्वासन फोल ठरत ठरले आहे. पालकमंत्री पांदन रस्ता अंतर्गत जिल्ह्यातील पांदन रस्त्यांना न्याय देण्याचा शब्द न पाळल्याने यांत्रीकीकरणाच्या युगातही शेतकरी चिखलातूनच स्वत: बैलगाडी काढण्याची नामुष्की ओढवली आहे.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : खराशी पुलाच्या बांधकामाने त्रासात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ.) : शेतकऱ्यांना रस्त्याची पायाभूत सुविधादेखील मिळत नसल्याने पालांदूरातील शेतकºयांचा शासनाविरोधात संताप अनावर होत आहे. शेतात जाण्यासाठी चांगला रस्ताच नसल्याने लाखनी तालुक्यातील पालांदूर शेतशिवारात खराशी पुलाजवळील दोन किलोमीटर पांदन रस्त्याच्या चिखलातून प्रवास करणे शेतकऱ्यांना मुश्कील झाले आहे.रस्त्याबाबत शेतकऱ्यांनी अनेकदा लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला तरी हे आश्वासन फोल ठरत ठरले आहे. पालकमंत्री पांदन रस्ता अंतर्गत जिल्ह्यातील पांदन रस्त्यांना न्याय देण्याचा शब्द न पाळल्याने यांत्रीकीकरणाच्या युगातही शेतकरी चिखलातूनच स्वत: बैलगाडी काढण्याची नामुष्की ओढवली आहे.खराशी रस्ता ते नारायण कडूकार गुरुजींंच्या शेतापर्यंत दोन किलोमीटर पांदन रस्ता मागील कित्येक वर्षापासून चिखलमय आहे. या चिखलात शेतकरी स्वत: बंडी ओढून शेतीत जाण्यासाठी कसरत करतो आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती दूर अंतरापर्यत असल्याने बंडीशिवाय शेतीसाहित्य शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहचवता येत नाही. त्यामुळे अनेकदा बैलांना देखील येथून चालणे शक्य होत नाही.त्यामुळे अनेकदा एकमेकांची मदत घेवून एकमेकांची चिखलात रुतलेली बैलबंडी शेतकऱ्यांना बाहेर काढावी लागते. पावसाची संततधार सतत सुरु असल्याने येथील चिखल वाढला असल्याने बंडीला अर्धा -एक फुटातून चिखल कापत रस्ता पार करावा लागतो आहे. यासाठी शेतकºयांनी वारंवार याविषयी बांधकाम विभाग लाखांदूर येथे तक्रार केली आहे.त्यावरच न थांबता क्षेत्रातील आमदार, पालकमंत्री, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, उपसरपंच, सरपंच तथा सामाजिक कार्यकर्त्यांना वारंवार भेटून शेतकऱ्यांनी पांदन रस्त्याच्या कामाची मागणी केली आहे.या पांदन रस्त्यावर चार ठिकाणी मोळी सीडीवर्कचे थातूर मातूर काम झाल्याचे रस्त्याने त्रस्त झालेले शेतकरी प्रभू कडूकार यांनी बोलताना सांगितले. वर्षभर शेतकरी या पांदन रस्त्याने जाणेयेणे करीत असल्याने महत्वाच्या खरीप हंगामात तरी शासनासह, लोकप्रतिनिधींकडे शेतकऱ्यांनी पांदन रस्त्याच्या कामाची त्वरीत मागणी केली आहे. या पांदन रस्त्यावरुन दररोज किमान १५० शेतकरी या पांदन रस्त्याने आवागमन करतात.खराशी पुलाच्या बांधकामामुळे पांदन रस्ता चिखलमय झाल्याची गावकºयांची तक्रार आहे. रस्त्यावर कंत्राटदाराने बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने जेसीपीच्या सहाय्याने पांदन रस्त्यात खडी मुरमाचा वापर न करता मातीची भरण दिल्याने रस्ता चिखलमय झाला आहे. त्यानंतर रस्त्याचे कोणतेही काम न केल्याने हा पांदन रस्ता जाण्यासाठी शेतकऱ्यांना अडसर ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.खराशी रस्त्यापासून माझ्या शेतापर्यंतच्या पांदन रस्त्याकरिता वारंवार प्रामाणिक प्रयत्न केले. स्वत:ही काही मलबा टाकला. पण चिखल खूप असल्याने संपूर्ण पांदन चिखलात आहे. शासनाने पांदन रस्ता अंतर्गत शेतकऱ्यांना रस्त्याची सुविधा देणे गरजेचे आहे.-मंगेश येवले,शेतकरी, पालांदूर (चौ.)

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती