शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

पवनीतील रेती घाटावर धडकले खासदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 05:01 IST

अवैध रेती उत्खनन विरोधात उपोषणाला बसलेल्या वलनीचे सरंपच दिपक तिघरे व त्यांचे सहकारी यांच्याशी खासदार मेंढे यांनी उपोषण ठिकाणी भेटून या संदर्भात चर्चा केली. त्यानंतर खा. मेंढे यांनी पवनीचे तहसिलदार यांच्याकडे जाऊन यासंबंधी विचारणा देखील केली.

ठळक मुद्देप्रशासनात खळबळ : विभागीय आयुक्तांना दिली माहिती, कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अवैध रेती उत्खनन होत असलेल्या रेती घाटावर खासदार सुनील मेंढे यांनी शुक्रवारी रात्री ८ वाजता अचानक भेट दिली असता अवैध रेतीचे ऊत्खनन सुरू दिसले. मोठ्या प्रमाणात अवैधरित्या उत्खनन असल्याने खा. सुनील मेंढे यांनी तातडीने विभागीय आयुक्तांना कल्पना दिली. या अवैध उत्खनना विरोधात कारवाईची करण्याची मागणी देखील केली.अवैध रेती उत्खनन विरोधात उपोषणाला बसलेल्या वलनीचे सरंपच दिपक तिघरे व त्यांचे सहकारी यांच्याशी खासदार मेंढे यांनी उपोषण ठिकाणी भेटून या संदर्भात चर्चा केली. त्यानंतर खा. मेंढे यांनी पवनीचे तहसिलदार यांच्याकडे जाऊन यासंबंधी विचारणा देखील केली.दरम्यान, तहसिलदारांनी सांगितलेल्या प्रशासकीय परवानगीसंबंधी माहितीमध्ये तफावत आढळल्याने खा. मेंढेनी येनोळाच्या उपस्याचे परवानगी आदेश दाखवा, असे सांगताच तहसीलदारांची भंबेरी उडाली. चुकीची माहिती मिळत असल्याने तेथूनच खासदार सुनील मेंढे यांच्या आदेशाने तहसीलदार पवनीची चमू, पोलिस विभाग, पत्रकार, कार्यकर्ते व गावकरी घेऊन रेतीघाटाकडे निघाले. भोजापुरात दोन घाटावर ४० ब्रास रेतीसाठा व दोन किमी नदीपात्रात उत्खनन दिसून आले. खातखेडा घाटात ५०० व ३५० ब्रास रेतीसाठा दोन किमी नदीपात्रात १५ फुटाचे किमान ३५ ठिकाणाहून उत्खनन सुरू असल्याचे आढळून आले. यासंबंधी अधिक माहिती देताना खासदार मेंढे म्हणाले, वाघधरा (पवनी) घाटावर दोन किमी अंतर ऊत्खनन झाल्याचे आढळून आले आहे. तसेच येनोळा येथे कायदेशीर घाट सांगून तीन महिन्यांपासून भरदिवसा एक हजार ब्रास उपसा सुरू आहे. तिथे पाच हजार ब्रास रेतीसाठा आहे. अशाप्रकारे अवैधरित्या मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन सुरू असल्याने सर्व नदी पात्राची ड्रोणद्वारे शुुटिंग करण्याचे निर्देश दिले. पवनीत २४ घाटावर एकूण अवैधरित्या रेती उत्खनन सुरू आहे. अवैध उत्खनन तातडीने थांबविण्याची मागणी विभागीय आयुक्तांना केली असल्याची माहिती खासदारांनी दिली.यावेळी राजेंद्र फुलबांधे, मोहन सुरकर, हरीश तलमले, अनील मेंढे, मनोहर आकरे, विलास कुर्झेकर, दत्तु मुनरतीवार, मच्छिंद्र हटवार, दिंगाबर वंजारी, मयुर रेवतकर, सचिन शहारे व शेकडो नागरिक उपस्थित होते. दरम्यान, वैनगंगा नदीला विद्रुप करणाऱ्या रेती माफिया, महसूल अधिकारी यांच्यावर आवर घाला, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Socialसामाजिक