शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

भंडाऱ्यातील मातांचा आक्रोश सातासमुद्रापार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 05:45 IST

या प्रमुख वृत्तसंस्था व माध्यमांनी घेतली दखल

योगेश पांडेनागपूर : भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयातील ‘एसएनसीयू’मध्ये लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने देशभरातील समाजमन हेलावले. ‘टीआरपी’च्या ‘रेस’मध्ये धावणाऱ्या काही भारतीय वाहिन्यांकडून या घटनेवर फारसे ‘डिबेट’ झाले नाही. मात्र सातासमुद्रापलीकडील प्रसारमाध्यमांनी मात्र या घटनेची दखल घेतली अन् दहाही मातांचा आक्रोश आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला.

अगदी कुणाचेही मन गलबलून येईल अशी घटना भंडाऱ्यात घडली. ‘लोकमत’ने सर्वात अगोदर ही बातमी ‘ब्रेक’ केल्यानंतर देशभरातील माध्यमांचे लक्ष या घटनेकडे केंद्रित झाले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनीदेखील याचे तातडीने वृत्तांकन केले. आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध माध्यमांनी या घटनेची दखल घेतली. मुद्रित, टेलिव्हिजन व ‘डिजिटल’ माध्यमांमध्ये या विदारक घटनेवर प्रकाश टाकण्यात आला. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांमुळे अनेक देशांतील वर्तमानपत्र व वाहिन्यांमध्ये वृत्तांकन झाले. यात अमेरिका, फ्रान्स, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, सौदी अरब यांचा समावेश आहे. याशिवाय पाकिस्तान व चीनमधील माध्यमांनीदेखील याची दखल घेतली.

भारतातील श्रीमंत राज्यातील प्रकारविविध वृत्तसंस्था व प्रसारमाध्यमांमध्ये भंडाऱ्याचे नाव ठळकपणे आले. जगातील आघाडीची वृत्तसंस्था ‘रॉयटर्स’ने तर भारतातील श्रीमंत राज्यामध्ये हा प्रकार झाल्याचे म्हणत महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेच्या कार्यप्रणालीवरच बोट ठेवले.

या प्रमुख वृत्तसंस्था व माध्यमांनी घेतली दखलरॉयटर्स (युनायटेड किंगडम), डेली मेल (युनायटेड किंगडम), एएफपी (फ्रान्स), फ्रान्स २४ (फ्रान्स), बीबीसी (युनायटेड किंगडम), सीएनएन (अमेरिका), द वेस्ट ऑस्ट्रेलियन (ऑस्ट्रेलिया), अरब न्यूज (सौदी अरब), द डॉन (पाकिस्तान), झिनुआ (चीन), व्हॉईस ऑफ अमेरिका (अमेरिका)

 

टॅग्स :Bhandara Fireभंडारा आगhospitalहॉस्पिटल