शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

भंडारा तालुक्यात सर्वाधिक ॲक्टीव्ह कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 5:00 AM

भंडारा जिल्हा सुरूवातीपासून कोरोना रुग्णांच्या बाबतीत सुदैवी ठरला आहे. लॉकडाऊनच्या सुरूवातीच्या काळात अत्यल्प रुग्णसंख्या होती. पहिला रुग्ण २७ एप्रिल २०२० रोजी आढळला होता. त्यानंतरही रुग्णवाढीची गती अगदी संथ होती. मात्र सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात रुग्णांची संख्या अचानक वाढली.  जिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार ५४८ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती.

ठळक मुद्देनियमांचे सर्रास उल्लंघन : ग्रामीण भागापेक्षा शहरात अधिक धोका, प्रशासनाकडून उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असला तरी अलीकडच्या काही दिवसात भंडारा शहरात रुग्णांची संख्या वाढायला लागली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ॲक्टीव्ह रुग्ण भंडारा शहरात असून नागरिकांकडून मात्र नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. शहरातील विविध भागात नागरिकांची गर्दी कोरोना वाढीसाठी पोषक ठरण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सध्या १७३ ॲक्टीव्ह कोरोना रुग्ण असून एकट्या भंडारा तालुक्यात त्यातील ९७ रुग्णांचा समावेश आहे. भंडारा जिल्हा सुरूवातीपासून कोरोना रुग्णांच्या बाबतीत सुदैवी ठरला आहे. लॉकडाऊनच्या सुरूवातीच्या काळात अत्यल्प रुग्णसंख्या होती. पहिला रुग्ण २७ एप्रिल २०२० रोजी आढळला होता. त्यानंतरही रुग्णवाढीची गती अगदी संथ होती. मात्र सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात रुग्णांची संख्या अचानक वाढली.  जिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार ५४८ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी १३ हजार ४८ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली. सध्या जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३१ टक्के आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३२७ व्यक्तींचा मृत्यू झाला असून मृत्यू दर २.४१ टक्के आहे. जानेवारी महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या एकदम घटायला लागली. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत रुग्णसंख्या अगदी अल्प होती. मात्र गत आठवड्याभरापासून जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढायला लागली. त्यात सर्वाधिक रुग्ण भंडारा तालुक्यातील आहेत. तालुक्यात आतापर्यंत ५६५५ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. भंडारा शहर काेरोनासाठी हॉटपॉट ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात कुठेही नियमांचे पालन होत असल्याचे दिसून येत नाही. नागरिक विना मास्क भटकंती करीत आहे. गर्दीच्या ठिकाणी फिजीकल डिस्टन्सिंगचेही पालन होत असल्याचे दिसत नाही. यामुळे कोरोना वाढण्याची भीती आहे.

एसटीतील गर्दी ठरू शकते धोकादायकराज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये मोठी गर्दी होत आहे. कोरोना नियमांचे कुठेही पालन होत नाही. फिजीकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत बसमध्ये खचाखच प्रवासी भरले जातात. अनेकांच्या तोंडाला मास्क नसतात. अनेकदा तर चालक आणि वाहकही विना मास्कचे दिसून येतात. बसमध्ये सॅनिटायझरची कोणतीही सुविधा नसते. यामुळे एसटीतील गर्दी कोरोना वाढीसाठी धोकादायक ठरू शकते.

भंडारातील बार-रेस्टारंटवर कारवाई  शहरात कोरोनाच्या रुग्णात वाढ होत असल्याने प्रादूर्भाव रोखण्यासाठी नगरपरिषदेने मोहीम हाती घेतली आहे. बुधवारी शहरातील विविध ठिकाणी या पथकाने धाडी मारून सहा बार-रेस्टारंटवर कारवाई केली. त्यांच्याकडून तीन हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये उपविभागीय अधिकारी मीनल करनवाल, नगरपरिषद मुख्याधिकारी विनोद जाधव यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली. या पथकाने खात रोड, गांधी चौक, मुस्लिम लायब्ररी चौक, राजीव गांधी चौक, बस स्थानक परिसर, जिल्हा परिषद चौक आदी ठिकाणी भेटी देवून पाहणी केली.

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या