शहरं
Join us  
Trending Stories
1
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
3
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
4
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
5
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
6
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
7
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
8
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
9
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
10
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!
11
E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा...
12
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातून का केली १ कोटींच्या कलशाची चोरी? समोर आलं भलतंच कारण!
13
आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
14
नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
15
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पंतप्रधानांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवन पेटवले
16
रुग्णालयातील आपत्कालीन वॉर्डमध्ये महिला रुग्णावर बलात्कार; गुंगीचं इंजेक्शन दिलं अन्...
17
कोण आहेत बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
18
Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
19
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
20
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले

एक पीकपद्धती शेती धोकादायक; संमिश्र पिकांची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 17:47 IST

Bhandara : मानवी आरोग्यासाठी चक्री पीक पद्धत वापराचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संमिश्र पीक पद्धतीचा अवलंब केल्यास आवश्यक अन्नद्रव्य घटक आहारात मिळून आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. परंतु, सध्या शेतकरी एकाच शेतात एकाच पिकाचे वाण वारंवार घेत आहेत. ही एक पीकपद्धती शेती, शेतकरी आणि मानवी आरोग्याचे संतुलन बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. शेतकऱ्यांनी शेतीचे आरोग्य व पीक क्षमता सुदृढ ठेवण्यासाठी संमिश्र पीकपद्धतीचा अवलंब करणे काळाची गरज आहे. सतत एकच वाण पुन्हा पुन्हा पेरणे शेतीची उत्पादनक्षमता घटण्यास कारणीभूत ठरत आहे. 

यांत्रिकीकरण आणि आधुनिक संकरीत वाण आल्याने एकाच जमिनीवर दोनपेक्षा अधिक वेळा उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. धान, सोयाबीन, तूर, ऊस, कापूस, उडिद हेच पीक वारंवार घेतले जातात. परंतु, शेतीची प्रत आणि मानवी आरोग्यासाठी आवश्यक इतर पिके घेणे गरजेचे आहे. त्यासाठी चक्री पीक पद्धतीचा वापर करावा, असे आवाहन कृषी अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

जिल्ह्यात मका, धान, कापूस आदी मुख्य पिकांचे उत्पादन घेतले जाते. मूग, मटकी, चवळी, मसूर, वटाणा आदी पिकेही घेतली जातात. परंतु, तेलबिया पीक जवस, करडी, मोहरी, सोयाबीन, भुईमूग याकडे अद्यापही अनेक शेतकऱ्यांकडून पाठ फिरवली जाते. भाजीपाल्यात कारले, भोपळा, दोडका, गवार, वाल, तोंडली तसेच पालेभाज्या उगविल्या जातात. तसेच फळ पीक आंबा, पेरू, चिकू, जांभूळ, सीताफळ, मोसंबी, रामफळ, बोरे आदींचे उत्पादन फारसे उत्पादन होत नाही.

तेलबिया उत्पादनाकडे होतेय दुर्लक्षअन्नघटकात आरोग्याच्या दृष्टीने तृणधान्य, द्विदलधान्य, एकदल धान्य, तेलबिया, फळ आदींचे महत्त्वाचे स्थान असते. मात्र, याकडे सरळ तेलबिया उत्पादनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. संमिश्र पीक पद्धतीचा अवलंब केल्यास आवश्यक ते सर्व अन्नद्रव्य घटक आहारात मिळून आरोग्य सुदृढ राहण्यास फायदेशीर ठरेल तसेच शेतीची प्रतसुद्धा संतुलित राहण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

"शेतकरीबांधवांनी आपली आणि शेतीची गरज म्हणून चक्री पद्धतीने पिकांची लागवड करावी. अन्नधान्य, कडधान्य पिकांसह तेलबिया, फळ उत्पादनांकडेही लक्ष द्यावे. रानभाज्यांचे महत्त्व ओळखून त्यादेखील जतन कराव्यात."- सुनील भडके, तालुका कृषी अधिकारी, मोहाडी.

टॅग्स :bhandara-acभंडाराfarmingशेती