सात जखमी : वनविभागाची असहकाराची भूमिका, ग्रामस्थांमध्ये संतापभंडारा : शहरालगत असलेल्या गणेशपूर येथे मागील काही दिवसांपासून माकडांनी उच्छाद मांडला आहे. माकडांच्या दोन गटात सुरु असलेल्या अंतर्गत वादात चार माकडांचा जीव गेला असून संतप्त माकडांनी येथील नागरिकांवर हल्ला करुन सात नागरिकांना जखमी केले आहे. याप्रकरणी वनविभागाने असहकाराची भूमिका घेतल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.गणेशपूर येथे मागील काही दिवसांपासून मर्कटलिलांमुळे नागरिक अक्षरश: हैराण झाले आहे. माकडांचे दोन गट या गावात एकमेकांवर आक्रमण करुन माकडांनाच जखमी करीत आहेत. एका घरावरुन दुसऱ्या घरावर उड्या मारुण या माकडांनी ग्रामस्थांना त्रस्त केले आहे. माकड्यांचा या कृत्यांमुळे अनेक कौलारु घरांचे नुकसान झाले आहेत. माकडांचा दोन गटात सुरु असलेल्या तंट्यात चार माकडांना जखमी होऊन जीव गमवावा लागला आहे. माकडांच्या या कृत्याची व माकडांच्या मृत्यूची माहिती गणेशपूर ग्रामपंचायतीने वनविभागाला दिली. मात्र वनविभागाने या बाबीकडे दुर्लक्ष केले असून ग्रामपंचायतीला माकड पकडण्यासाठी मदत करण्याऐवजी असहकार्याची भूमिका घेतली आहे. याबाबत प्रशासनाने वनविभागाकडून असहकार्य मिळत असल्याने संताप व्यक्त केला आहे. नागरिकांनी वन्यप्राण्यांच्या जीविताला धोका पोहचवू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल असा नियम आहे. जर नागरिकांना वन्यप्राण्यांचा त्रास होत असल्यास याची जबाबदारी वनविभागाने का घेवू नये, असा संतप्त सवाल गणेशपूर वासीय करीत आहे. (शहर प्रतिनिधी)वनविभागाचे नियम वन्यप्राण्यांसदर्भात सुरक्षेचे आहे. मग नागरिकांच्या आयुष्याची जोखीम वनविभागाने घ्यायला पाहिजे. वनविभागाने माकडांचा बंदोबस्त करण्याकरिता ग्रामपंचायतीला सहकार्य करावे.-वनिता भुरे, सरपंच, ग्रा. पं. गणेशपूरमी आता महत्वाच्या कामात आहे. याबाबत सकाळी वनविभागाच्या कार्यालयात या सविस्तर चर्चा करु.-निलय भोगे, वनपरिक्षेत्राधिकारी भंडारा
गणेशपुरात माकडांचा उच्छाद
By admin | Updated: February 28, 2017 00:29 IST