शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात गृहयुद्ध! बलूचिस्तानात बंडखोरांसोबत झालेल्या झटापटीत पाक सैन्याचे २३ जवान ठार
2
राजा रघुवंशी प्रकरणात समोर आले आणखी एक नाव, सोनम-राजशी आहे थेट कनेक्शन! कोण आहे 'हा' व्यक्ती? 
3
काल निवृत्ती, आज लगेच दुसऱ्या संघाचा कर्णधार... 'या' स्टार खेळाडूला मिळाली मोठी जबाबदारी
4
स्वस्तात ऑनलाईन वस्तू विकणाऱ्या 'मीशो'चं नाव बदललं! का घेतला मोठा निर्णय?
5
रस्त्यावर महिला दिसताच धावत जाऊन घ्यायचा चुंबन, 'सायको किसर'ला पोलिसांनी घातल्या बेड्या!
6
एकेकाळी शून्य झालेली अनिल अंबानींची नेटवर्थ, आता जबरदस्त कमबॅक; 'या' दोन कंपन्यांनी केलं मालामाल
7
ऑपरेशन सिंदूरदरम्यान कुणाचं झालं सर्वाधिक नुकसान? अमेरिकन रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड
8
ट्रम्प-मस्क वादात नवा ट्विस्ट; आता टेस्ला प्रमुखांना होतोय 'या' गोष्टीचा पश्चाताप, म्हणाले...
9
Sonam Raghuwanshi: हत्या होण्यापूर्वी राजा रघुवंशी सोनमसोबत इथे थांबला होता, पहा व्हिडीओ
10
राजाच्या रक्तानं माखलेलं जॅकेट फेकलं अन् आकाशला...; 'बेवफा' सोनमनं काय काय केलं?
11
Raja Raghuvanshi Murder: कोण आहे अल्बर्ट पीडी? ज्याच्या एका जबाबामुळे सोनम रघुवंशीचा खरा चेहरा जगासमोर आला
12
स्वत:च्या फायद्यासाठी महिलांना वेश्या व्यवसायात ढकललं, आरोपींना अटक; १० जणांची सुटका!
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री झाली आई, दोन दिवसांपूर्वीच घरी आला छोटा पाहुणा; मुलगा की मुलगी?
14
'काम करु नका, मुले जन्माला घाला'! लोकसंख्या वाढीसाठी 'या' देशाने काढले फर्मान
15
Sonam Raghuvanshi : "मी कोणाशीही लग्न केलं तरी मी तुझीच गर्लफ्रेंड...", सोनमसमोर स्टेजवर ढसाढसा रडला राज
16
डिलिव्हरी फ्री, पॅकेजिंग फ्री फक्त... रॅपिडोची फूड डिलिव्हरी बाजारात एन्ट्री! झोमॅटो-स्विगी टेन्शनमध्ये?
17
Vastu Tips: आर्थिक संकट असो वा जुना आजार; झोपण्यापूर्वी 'या' उपायाने मिळेल समाधान!
18
राजा रघुवंशी हत्याकांडावर सीमा हैदरच्या वकिलांचं मोठं विधान, म्हणाले - 'इस्लाम धर्मात...!'
19
महाराष्ट्रात मद्याच्या किंमतीत वाढ; दारूचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स आपटले
20
सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान मोदींना भेट दिली दोन खास पुस्तकं, काय आहेत नावं?

भंडाऱ्यात मुख्याध्यापकाचा मोबाईलच्या स्फोटात मृत्यू; बाईक चालवत असतानाच झाला स्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 17:37 IST

मोबाईलच्या स्फोटात एका शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे.

Principal Died In Mobile Blast :  मोटारसायकल चालवत असताना खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाल्यानं त्यात गंभीर जखमी होऊन मुख्याध्यापकाचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. तर मुख्याध्यापकाच्या मृत्यूनं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून मोबाईलचा स्फोट नेमका कसा झाला याचा शोध सुरु करण्यात आला आहे.

भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील सानगडी नजीक असलेल्या सिरेगावटोला येथे ही धक्कादायक घटना घडली. सुरेश संग्रामे (वय ५५) असं मृतक मुख्याध्यापकाचं नाव आहे. सुरेश संग्रामे हे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते.  तर नत्थु गायकवाड (५६) असं गंभीर जखमी असलेल्या मागे बसलेल्या व्यक्तीचे नाव आहे. जखमी नत्थु गायकवाड यांच्यावर सध्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत सुरेश संग्रामे आणि गंभीर जखमी नत्थु गायकवाड हे नातेवाईक असून दोघेही भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सिरेगावटोला येथील रहिवासी आहेत. दोघेही मोटारसायकलवरुन नातेवाईकाच्या एका कार्यक्रमासाठी अर्जुनी मोरगावकडं जात असताना ही घटना घडली.

खिश्यात मोबाइलाचा स्फोट झाल्यानंतर सुरेश संग्रामे यांच्या कपड्याला आग लागली होती. भाजल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या मागे बसलेले नत्थु गायकवाड हे गाडीवरुन पडल्याने ते गंभीर जखमी झालेत. त्यांना भंडारा येथील लक्ष हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मोबाईलची बॅटरी जास्त गरम झाल्यामुळे स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस आता पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, तज्ञांच्या म्हणण्यांनुसार अनेक कारणांनी मोबाईलचा स्फोट होऊ शकतो. मात्र यातील प्रमुख कारण म्हणजे मोबाईलची बॅटरी आहे. मोबाईल अनेक तास चार्जिंगला ठेवल्याने बॅटरीचा स्फोट होऊ शकतो. तर मोबाईल जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहिल्यास बॅटरी जास्त गरम होऊन स्फोट होऊ शकतो. त्यामुळे अतिप्रमाणात चार्जिंग न करण्याचा सल्ला अनेक जण देतात. 

टॅग्स :AccidentअपघातMobileमोबाइलBlastस्फोट