भंडारा : एलोरा पेपरमिल देव्हाडा येथे दि.१५ मार्च पासून विविध मागण्यांसाठी ७३ कामगारांचे साखळी उपोषण सुरु होते. परंतु अजनूपर्यंत कंपनी मालकांनी दखल घेतलेली नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कंपनी मालकाविरोधात हल्लाबोलचा इशारा दिला आहे.एलोरा पेपरमिल कंपनीची सन १९७३-७४ मध्ये स्थापना झाली. स्थानिक लोकांना रोजगार मिळावा हा उद्दात हेतू ठेवून देव्हाडा ग्रामपंचायतने १०० एकर जमीन कंपनीला दिली. त्यामुळे कंपनी ४०० स्थानिक लोकांना रोजगार मिळाला. त्यावेळी इन्क्रीमेंट वेतनश्रेणी वाढ, प्रमोशन, घरभाडा, धुलाई भत्ता, रात्रकालीन भत्ता, डस्ट भत्ता, वाहन भत्ता, ओव्हरटाईम या सुविधा वेळोवेळी देण्याचे ठरले होते. परंतु या सगळ्या सुविधांपासून कर्मचारी वंचित राहिले. कंपनी विरोधात आंदोलन करण्याचे प्रयत्न केले असता त्यांना वेळोवेळी काढण्यात आले. आजच्या तारखेत फक्त ७३ कर्मचारी वंचित राहिले. कंपनी विरोधात आंदोलन करण्याचे प्रयत्न केले असता त्यांना वेळोवेळी काढण्यात आले. आजच्या तारखेत फक्त ७३ कर्मचारी कार्यरत असून त्यांच्याकडून ४०० कर्मचाऱ्यांचे कामे करवून घेतले जात आहे. ७३ कर्मचाऱ्यांना उर्वरीत सन २०१३-१४-१५ चा ओव्हरटाईमचा पैसा अद्यापपर्यंत मिळालेला नाही. सन २००४-०८ पर्यंतचा एरियस मिळालेला नाही. न्यायालयात खटला न्याय प्रविष्ठ असताना सुद्धा ५ कर्मचाऱ्यांना सेवेतून काढण्यात आले. त्यांच्या घराचे इलेक्ट्रीक कनेक्शनसुद्धा कंपनीने बंद केले.कंपनी कोटी रुपयांनी फायद्यात असल्यावरही कंपनीमार्फत कंपनी बंद करण्याची धमकी १५ वर्षापासून देत आहे. कंपनी व्यवस्थापन उपोषणकर्त्यांबरोबर चर्चेसाठी व शिष्टमंडळाबरोबर बसण्यास टाळाटाळ करीत असतात अशा उर्मट मालकांची मस्ती उतरविण्यासाठी उपोषणावर बसलेल्या कामगारांना न्याय मिळावा अन्यथा कंपनी मालकाविरोधात कंपनीवर हल्ला बोल करण्याचा इशारा मनसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय शहारे व कार्यकत्यांनी दिला आहे. (नगर प्रतिनिधी)
मनसेचे साखळी उपोषण
By admin | Updated: May 8, 2015 00:45 IST