शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आमदार कारेमोरेंची पुन्हा घसरली जीभ, शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2022 10:40 IST

सोमवारी एका कार्यकर्त्याच्या मुलीच्या लग्नात आमदार कारेमोरे डीजेवर थिरकल्याचा व्हिडिओ सोमवारी व्हायरल झाला आणि मंगळवारी पुन्हा बांधकामावरून कंत्राटदाराला शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ठळक मुद्देकंत्राटदाराला शिवीगाळ

भंडारा : नववर्षाच्या पूर्वसंध्येला मोहाडी पोलीस ठाण्यात शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या आमदार राजू कारेमोरे (Raju Karemore) यांची पुन्हा जीभ घसरली. मोहाडी तालुक्यातील धोप येथे रस्ता बांधकामावरून कंत्राटदाराला शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ मंगळवारी व्हायरल झाला.

मोहाडी तालुक्यातील धोप गावातील रस्त्याची समस्या गावकऱ्यांनी आमदार राजू कारेमोरे यांना सांगितली. त्यांनी थेट धोप गाव गाठत रस्ता बांधकामावरून जाब विचारला. जाब विचारताना त्यांची पुन्हा जीभ घसरली. कंत्राटदारासह शासकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली. हा व्हिडिओ मंगळवारी जिल्ह्यात व्हायरल झाला.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला मोहाडी पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांसाठी पोहोचून आमदार कारेमोरे यांनी शिवीगाळ केली होती. त्यावेळी संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. एक रात्र त्यांना कारागृहातही राहावे लागले. ही घटना ताजी असतानाच सोमवारी एका कार्यकर्त्याच्या मुलीच्या लग्नात आमदार कारेमोरे डीजेवर थिरकल्याचा व्हिडिओ सोमवारी व्हायरल झाला आणि मंगळवारी पुन्हा शिवीगाळीचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

कंत्राटदाराला जाब विचारला

महामार्गाचे काम निकृष्ट झाले आहे. रस्ता उंच बांधल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरते. याबाबत अनेकदा कंत्राटदाराला सूचना दिली. परंतु एक शब्दही बोलायला तयार नाही. नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून आपण तेथे पोहोचलो. राग अनावर झाल्याने आपण त्यांना समज दिली.

- आमदार राजू कारेमोरे

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसMLAआमदार