शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आमदाराला मारहाणप्रकरणी डॉ. कारेमोरे यांना जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 21:46 IST

भाजपचे आमदार चरण वाघमारे आणि माजी आमदार सुभाषचंद्र कारेमोरे यांचा मुलगा अस्थी विकारतज्ञ डॉ. पंकज कारेमोरे यांच्यात वाद होऊन झालेल्या मारहाणप्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉ. कारेमोरे यांना तुमसर न्यायालयाने गुरूवारी जामीन मंजूर केला.

ठळक मुद्देतुमसरात अद्याप तणाव : न्यायालयाने फेटाळली पोलीस कोठडीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : भाजपचे आमदार चरण वाघमारे आणि माजी आमदार सुभाषचंद्र कारेमोरे यांचा मुलगा अस्थी विकारतज्ञ डॉ. पंकज कारेमोरे यांच्यात वाद होऊन झालेल्या मारहाणप्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉ. कारेमोरे यांना तुमसर न्यायालयाने गुरूवारी जामीन मंजूर केला. गुरूवारी दुपारी ३ वाजता तगड्या पोलीस बंदोबस्तात डॉ. कारेमोरे यांना न्यायालयात नेण्यात आले.४ फेब्रुवारीला आयोजित मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या जागेची तथा मंडप उभारणीच्या कामांची पाहणी करीत असताना झाड तोडण्यावरुन डॉ. पंकज कारेमोरे व आ. चरण वाघमारे यांच्यात वाद झाला होता. डॉ. कारेमोरे यांनी आ. वाघमारे यांना धक्काबुक्की केली. मध्यस्थी करणारे नगरसेवक श्याम धुर्वे यांनाही मारहाण केली होती. त्यानंतर आ. चरण वाघमारे व शेकडो कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे गाठून डॉ. पंकज कारेमोरे यांना अटक करण्याची मागणी केली.तुमसर पोलिसांनी तात्काळ डॉ. पंकज कारेमोरे यांना अटक केली. त्यांच्या विरोधात भादंवि ३४३, (शासकीय कामात अडथडा आणणे) ५०६, २९४, ३२३ अन्वये सुद्धा दाखल केला. दरम्यान शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. बावनकर चौकात टायर पेटवून निषेध व्यक्त केला. तुमसर न्यायालयात गुरूवारी दुपारी ३ च्या सुमारास कडेकोट पोलीस बंदोबस्तात डॉ. पंकज कारेमोरे यांना आणण्यात आले. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाºयांनी डॉ. पंकज कारेमोरे यांना जामीन मंजूर केला. तुमसर पोलिसांनी डॉ.कारेमोरे यांना पोलीस कोठडीची मागणी केली होती, परंतु न्यायालयाने ती फेटाळून लावली. तुमसरात सध्या तणावाची स्थिती आहे. ४ फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा निश्चित आहे. त्याकरिता पोलीस प्रशासन सज्ज आहे.आमदार चरण वाघमारे यांना धक्काबुक्की प्रकरणात तुमसर न्यायालयाने डॉ. पंकज कारेमोरे यांचा जामीन मंजूर केला. पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाने फेटाळली. ४ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांची नियोजित सभा पोलीस बंदोबस्तात होणार आहे.-विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर.

टॅग्स :Crimeगुन्हाMLAआमदार