शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
3
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
4
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
5
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
6
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
7
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
8
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
9
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
10
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
11
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
12
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
13
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
14
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
15
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
16
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
17
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
18
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
19
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
20
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?

मिश्र रोपवन आगीत भस्मसात

By admin | Updated: March 24, 2017 00:31 IST

सन २०१६-१७ मध्ये १२ हेक्टर क्षेत्रात लागवड केलेल्या सुरेवाडा मिश्ररोपवनाला २२ फेब्रुवारी रोजी आग लागली होती.

सुरेवाडा येथील प्रकार : झाडांचे नुकसान, आगीचे कारण गुलदस्त्यातभंडारा : सन २०१६-१७ मध्ये १२ हेक्टर क्षेत्रात लागवड केलेल्या सुरेवाडा मिश्ररोपवनाला २२ फेब्रुवारी रोजी आग लागली होती. आगीमुळे अर्धा हेक्टरमधील झाडांचे नुकसान झाले होते. त्याच रोपवनाला पुन्हा २२ व २३ मार्च रोजी आग लागली. यात ३ ते ४ हेक्टरमधील झाडांचे नुकसान झाले. सहाय्यक वनपरिक्षेत्राधिकारी अधिकारी गौरी निनावे म्हणतात, मागीलवेळची आग फायर लाईनला लागली होती. एकाही झाडाचे नुकसान झाले नव्हते. आता अडीच हेक्टर क्षेत्राला आग लागल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु आगीत ३ ते ४ हेक्टरमधील रोपवनाचे नुकसान झाले आहे. झाडांचा कोळसा झाला आहे. रोपवनासाठी चौकीदाराची नियुक्ती असतानाही आग कशामुळे लागली याची माहिती त्यांना नाही. एकाच रोपवनाला दोनदा आग लागत असताना साधी चौकशी करण्यात आलेली नाही. सन २०१६-१७ मध्ये सुरेवाडा पुनर्वसन जवळ भंडारा वनविभागाकडून कृत्रिम पुननिर्मिती योजनेअंतर्गत मिश्र रोपवनाची लागवड करण्यात आली होती. या रोपवनात साग, बेल, आवळा आदी झाडांची लागवड करण्यात आली. सुमारे १२ हेक्टर क्षेत्रात, कक्ष क्रमांक ९७, गट क्रमांक ९१९ मध्ये सन २०१६-१७ मध्ये सदर रोपवन लावण्यात आले. १२ हेक्टर क्षेत्रात १२,२२१ झाडांची लागवड करण्यात आली. सदर रोपवन सुरेवाडा गावाशेजारी भिलेवाडा ते खमारी मार्गावर आहे.भिलेवाडा ते खमारी रस्त्याचे बाजूने रोपवनाला २२ फेब्रुवारी रोजी आग लागली होती. आगीचे कारण अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. महिनाभरानंतर पुन्हा लागलेल्या आगीमुळे रोपवनातील झाडे जळून भस्मसात झाली. रोपवनात मोठ्या प्रमाणात वाळलेले गवत, कचरा असल्याने झाडांचे नुकसान झाले. आग लागलेली जागा काळीकुट्ट पडली आहे. रोपवनाची लागवड करण्यात आल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्या रोपवनाकडे दुर्लक्ष केले. विडींग व कॅज्युल्टी केवळ दिखाव्यापुरती करण्यात आली. खत व औषधी नाममात्र वापरण्यात आली. त्यामुळे झाडांची वाढ खुंटली आहे. दोन महिन्यात दोनदा लाग लागली असताना वनपरिक्षेत्राधिकारी एन.एस. भोगे म्हणतात, माहिती हवी असल्यास माहिती अधिकाराचा वापर करावा. चौकीदार कामावर असताना आग कशामुळे लागली हे अधिकाऱ्यांना माहिती नाही? प्रकरण दडपण्यासाठी वनविभागाकडून खटाटोप सुरू आहे. आगीमुळे झालेल्या नुकसानीची चौकशी करण्याची मागणी वन्यप्रेमींनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)