शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

दूध प्रक्रिया कारखाना सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 05:00 IST

भंडारा येथील जिल्हा दूध उत्पादक संघाच्या या प्रकल्पाला शुक्रवारी सायंकाळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी भेट दिली. बंद पडलेला कारखाना सुरळीत करण्यासाठी तज्ज्ञ लोकांची मदत घेतली जाणार आहे. काही कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे कारखाना सुरू करण्यास उशीर झाला, अशा कर्मचाऱ्यांची ना. केदार यांनी कानउघाडणी केली.

ठळक मुद्देसुनील केदार : जिल्ह्यातील दूध उत्पादकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा हा दूध उत्पादक जिल्हा आहे. मात्र जिल्हा दूध उत्पादक संघाचा दूध प्रक्रिया प्रकल्प प्रशासकीय यंत्रणेच्या समन्वयाअभावी बंद आहे. त्यामुळे दूध उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. आता हा कारखाना लवकरच सुरू होणार असून असे निर्देश दुग्ध व पशुसंवर्धन मंंत्री सुनील केदार यांनी दिली आहे.भंडारा येथील जिल्हा दूध उत्पादक संघाच्या या प्रकल्पाला शुक्रवारी सायंकाळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी भेट दिली. बंद पडलेला कारखाना सुरळीत करण्यासाठी तज्ज्ञ लोकांची मदत घेतली जाणार आहे. काही कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे कारखाना सुरू करण्यास उशीर झाला, अशा कर्मचाऱ्यांची ना. केदार यांनी कानउघाडणी केली. कारखाना बंद असल्याने दूध उत्पादकांचे मोठे नुकसान होत असल्याची जाणीव त्यांना करून दिली. हा कारखाना लवकरात लवकर सुरू करण्याचे सक्तीचे निर्देश सुनील केदार यांनी दिले. हा दूर प्रक्रिया कारखाना सुरू झाल्यास जिल्ह्यातील दूध उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, आमदार राजू कारेमोरे, आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हा दूध संघाचे संचालक विनायक बुरडे, रामलाल चौधरी, माजी शिक्षण राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, शिवा गायधने उपस्थित होते.दोन कोटींचा निधीभंडारा येथील वरठी रस्त्यावर दूध प्रक्रिया कारखाना उभारण्यात आला होता. परंतु तो अद्यापही सुरू झाला नाही. आता या कारखान्यासाठी पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्र्यांनी दोन कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे कारखाना लवकरच सुरू होण्याच्या आशा पल्लवीत झाला आहे.

टॅग्स :milkदूधNana Patoleनाना पटोले