शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड आनंद यांचे सौजन्याने होणार सहकारी संस्थांमार्फत दूध संकलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 11:51 IST

Bhandara : दूध संकलन संस्थांनी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी जिल्हा प्रशासनाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : शासन आदेशानुसार सहकारी संस्थांमार्फत दूध संकलन होणार असल्याने दूध संकलन संस्थांनी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. शासन निर्णयान्वये देशातील सहकार चळवळ मजबूत करणे आणि सहकार चळवळ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्र शासनाच्या पत्रान्वये ज्या गावातील प्राथमिक सहकारी संस्था आणि भारत सरकारच्या विविध योजनांच्या एकत्रीकरणाद्वारे विद्यमान प्राथमिक कृषी सहकारी संस्थांनी दुग्धव्यवसायामार्फत बळकट करण्याचे प्रस्तावित आहे.

याकरिता राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड आनंद यांचे सौजन्याने भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघामार्फत सदर योजना कार्यान्वित केली जाणार आहे. जिल्ह्यातील ३० विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून दुधाचे संकलन करण्याचे निश्चित केलेले आहे.

जिल्ह्यातील ज्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाने निवड केली आहे. अशा संस्थांनी भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाशी दुग्धसंकलन करण्याकरिता लागणारी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. कार्यक्षेत्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना दुधाचा पुरवठा करून केंद्र शासनाच्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था भंडारा यांनी कळविले आहे.

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठाbhandara-acभंडारा