लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत आठवडाभरापासून ऊन-पावसाचा खेळ सुरू असला, तरी दहा ते बारा दिवसांपूर्वी पारा ४४ अंशांवर पोहोचला होता. उष्ण तापमानामुळे जिल्ह्यातील जलस्तरात मोठ्या प्रमाणात घट होण्यास सुरुवात झाली.
सध्या जिल्ह्याच्या मध्यम आणि लघु प्रकल्पातील जलस्तर तळाला गेलेला असून, माजी मालगुजारी तलावातही पाणी फारच कमी झाले आहे. पाणीपातळीत लक्षणीय घट झालेली आहे. जिल्ह्यात दोन मोठे धरण, मध्यम चार, ३१ लघु प्रकल्प, तर मामा तलाव २८ आहेत. सध्या लघु प्रकल्पातील जलस्तर तळाला पोहोचणार की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मामा तलावात ३२ टक्के जलसाठा आहे. मे महिन्याला आता सुरुवात झाली असल्याने तलाव व लघु प्रकल्पात आवश्यक प्रमाणात पाणी राहणार नाही, अशी चिन्हे आहेत.
जिल्ह्यात वैनगंगासह बावनथडी, चुलबंद, सुर नद्या आहेत. मात्र बावनथडीचा तुमसरातील प्रवास वगळता ही नदी कोरडी आहे. वैनगंगेतही धरणातील पाण्याच्या साठ्यामुळे पाणी मुबलक प्रमाणात आहे. मात्र मोहाडी, तुमसर, साकोली, लाखांदुर व लाखनी परिसरातील नदीचे पात्र कोरडे पडले आहे. हर घर नल ही मोहीम पुर्णतः कार्यान्वित झालेली नाही. परिणामी जिल्ह्यात जलसंकट कायम आहे.
प्रकल्पांमध्ये पाणीसाठाजिल्ह्यातील मध्यम प्रकल्प असलेल्या चांदपूर, बघेडा, बेटेकर बोथली व सोरणा जलायश प्रकल्पात एकूण उपयुक्त जलसाठा १०.२३३ दलघमी एवढा आहे. ही आकडेवारी १ मे रोजीपर्यंतची आहे. गाव तलावांमध्ये पाणी थोडेफार शिल्लक आहे. डिसेंबर २०२४ पासूनच प्रकल्पांमधील पाणी पातळी झपाट्याने घटली. उन्हाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा यात मोठी घट झाली.
७ तालुकेजिल्ह्यात असुन पाणीटंचाईच्या समस्या कायम आहेत. ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गतही आराखडा तयार करण्यात आला.
भंडारा शहरासह अन्य शहरांमध्ये पाणीटंचाईभंडारा शहरासह अन्य शहरांमध्ये पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. यात ग्रामीण क्षेत्रही अपवाद नाही. दुसरीकडे नागरिकांना अनियमित पाणीपुरवठा केला जात आहे. यावर्षीसुद्धा ही समस्या कायम आहे.
नगर पालिका क्षेत्रात टँकरने पाणीपुरवठाभंडारा असो की पवनी अथवा साकोली. येथे काही ठिकाणी आजही टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नवीन वस्ती असलेल्या ठिकाणी पाण्याची टंचाई असल्याने नागरिकांना आवश्यक प्रमाणात पाणीपुरवठा सुरू आहे.