तुमसर शहराच्या विकासासाठी नगराध्यक्षांनी केली ३० कोटींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 01:29 AM2019-06-12T01:29:09+5:302019-06-12T01:30:10+5:30

नगरपरिषद तुमसर भंडारा जिल्ह्यातील 'ब' वर्ग नगरपरिषद असून नगरपरिषद तुमसर क्षेत्रात नागरिकांना सोयी सुविधा पुरविण्याचा दृष्टीने नगरपरिषद क्षेत्रात विविध विकास कामे करण्याकरिता शासनाच्या विविध योजनेअंतर्गत निधीची आवश्यकता आहे.

The mayor has demanded Rs 30 crore for the development of the city | तुमसर शहराच्या विकासासाठी नगराध्यक्षांनी केली ३० कोटींची मागणी

तुमसर शहराच्या विकासासाठी नगराध्यक्षांनी केली ३० कोटींची मागणी

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना निवेदन : शाळा बांधकामाला देणार प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : नगरपरिषद तुमसर भंडारा जिल्ह्यातील 'ब' वर्ग नगरपरिषद असून नगरपरिषद तुमसर क्षेत्रात नागरिकांना सोयी सुविधा पुरविण्याचा दृष्टीने नगरपरिषद क्षेत्रात विविध विकास कामे करण्याकरिता शासनाच्या विविध योजनेअंतर्गत निधीची आवश्यकता आहे. यासाठी तुमसर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष इंजि. प्रदीप पडोळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथील वर्षा निवासस्थानी भेटून निवेदन देत ३० कोटी रुपयांची मागणी केली.
यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण योजना शहरात विविध ठिकाणी कमर्शिअल कॉम्प्लेक्स इमारतीचे बांधकाम, नगरपरिषद माकडे शाळेचा इमारतीचे बांधकाम करणे, नगरपरिषदेचा खाली जागेवर स्विमिंग पुलकम स्केटिंग ग्राऊंडचे बांधकाम करणे, शहरातील विविध ठिकाणी समाज भवन, व्यायामशाळा, वाचनालय व सभामंडपाचे बांधकाम करणे, नगरपरिषद शाळा इमारत व कमर्शिअल कॉम्प्लेक्सचे बांधकाम करणे.
विशेष रस्ता अनुदान योजना शहरातील विविध रस्त्यांचे सिमेंटिकरण व नाली बांधकाम करणे. सर्वसाधारण रस्ता अनुदान योजना शहरातील विविध रस्त्यांचे सिमेंटिकरण, नाली व पेव्हिंग ब्लॉक बसविणे सह इतर आवश्यक असणाऱ्या विकासकामांसाठी तुमसरचे नगराध्यक्ष इंजि. प्रदीप पडोळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ३० कोटी रुपयांची मागणी केली आहे. सदर निधी मंजूर करण्यात येणार असल्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले. यावेळी नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे व विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके उपस्थित होते.

Web Title: The mayor has demanded Rs 30 crore for the development of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.