माती व शेणखताच्या बिलांची जुळवाजुळव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 01:09 AM2019-07-21T01:09:33+5:302019-07-21T01:10:01+5:30

येथील वनपरिक्षेत्र अंतर्गत वृक्ष लागवडीत गौडबंगाल असे वृत ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच वनविभागात सावरासावर सुरु झाली.गाळयुक्त माती व शेणखताचे बिलांची जुळवाजुळव करण्यासाठी वनकार्यालयात श्निवारी एकच धावपळ सुरु होती.

Match the Soil and Soil Bills | माती व शेणखताच्या बिलांची जुळवाजुळव

माती व शेणखताच्या बिलांची जुळवाजुळव

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । तुमसर वनविभागात खळबळ, ३ लाख २८ हजार वृक्ष लागवडीचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : येथील वनपरिक्षेत्र अंतर्गत वृक्ष लागवडीत गौडबंगाल असे वृत ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच वनविभागात सावरासावर सुरु झाली.गाळयुक्त माती व शेणखताचे बिलांची जुळवाजुळव करण्यासाठी वनकार्यालयात श्निवारी एकच धावपळ सुरु होती. गाळयुक्त माती व शेणखतांची येथे निविदा मागविण्यात आल्या होत्या, हे विशेष.
तुमसर वनपरिक्षेत्र अंतर्गत २१ साईट वर वृक्ष लागवड करायचे निश्चित करण्यात आले आहे. आतापर्यंत ३ लाख २८ हजार वृक्ष लागवड येथे करण्यात आली. त्याकरिता ६ कोटी खर्च करण्यात आले. येथे ८ लाख २३ हजार ८२३ झाडांची लागवड करायचे आहे. वृक्ष लागवडीकरिता तुमसर वनपरिक्षेत्र कार्यालयाने कंत्राटदाराकडून गाळयुक्त माती व शेणखतांच्या निविदा मागविल्या होत्या. गाळयुक्त माती तलावातून आणावयाची होती. कमी किमतीत पुरवठा करणाऱ्या स्थानिकांकडून गाळयुक्त माती व शेणखत पुरवठा करण्यात आला. स्थानिक लोकांकडून निविदा १ जून २०१९ रोजी जाहीरनामा काढून निविदा ए-वन फॉर्ममध्ये मागविण्यात आले होते. येथे तुलनात्मक तक्ता तयार करण्यात आला. त्यानंतर तुलनात्मक तक्ता भंडारा उपवन् मंजूरीकरिता सादर करण्यात आले.
यात गाळयुक्त मातीसाठी ४ लाख १९ हजार तर शेणखतासाठी ११ लाख २० हजार मंजूर करण्यात आले. एकुण किंमत १५ लाख ३९ हजारांची मंजुरी प्रदान करण्यात आली. येथे शेणखत पुरेसे मिळाले नाही अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी गोविंद लुचे यांनी दिली.
गाळयुक्त माती तलावातून काढण्यात आली असा कागदी पुरावा येथे आहे, परंतु नियमानुसार महसूल विभाग तथा तलावाची मालकी असलेल्या इतर विभागाकडून मंजुरीची टीपी येथे नाही.
वनपरिक्षेत्र अधिकारी गोविंद लुचे म्हणाले, शेणखत व गाळयुक्त मातीकरिता जाहीर सूचना करून ए-वन फॉर्ममध्ये बंद लिफाफ्यात निविदा मागविण्यात आली होती. सर्वात कमी दर असलेल्या स्थानिकांनी येथे शेणखत व पाखण माती पुरविली. तर काँग्रेसचे नेते डॉ. पंकज कारेमोरे म्हणाले, शेणखत व पाखण माती येथे वृक्ष लागवड करताना उपयोग करण्यात आला नाही. गाळयुक्त माती आणल्याची येथे टीपी नाही. शेणखत उपलब्ध न झाल्याने रासायनिक खत घालण्यात आले. असे सांगण्यात येत आहे. वास्तविक येथे कागदोपत्री शेणखत व पाखणमाती घालण्यात आली आहे.
मुल्यमापन समितीने केले मुल्यांकन
वृक्ष लागवडीनंतर नागपूर येथील मुल्यमापन समिती येथे आली होती. त्यांनी मुल्यांकन केले होते. अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी गोविंद लुचे यांनी दिली. मुल्यांकन समितीचे प्रमुख सीसीएफ दर्जाचे अधिकारी होते. त्यांनी केवळ कागदोपत्री मुल्यांकन केले काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत भंडारा जिल्ह्यात ५३.९९ लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. सदर प्रकारामुळे वृक्ष लागवड मोहिमेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वृक्ष लागवड करणारे मजुरांनी पाखण माती व शेणखताचा वापर चांदपूर बिटमध्ये केला नाहे असे सांगितले. त्यामुळे येथील वृक्ष लागवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Match the Soil and Soil Bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.