शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

नेटवर्क मार्केटिंगचा अनेकांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 01:17 IST

जिल्ह्यात सध्या नेटवर्क मार्केटिंग कंपनीचे जाळे सर्वदूर पसरले असून अतिरिक्त आर्थिक लाभाचे आमिष देऊन लाखोंची फसवणूक केली जात आहे. बेरोजगार व महत्वाकांक्षी तरूण टार्गेट केले जात आहे. भरपुर पैसा कमविण्याच्या नादात तरूण या कंपन्यांच्या जाळ्यात अडकत आहेत.

ठळक मुद्देबेरोजगार तरुण -तरुणी निशाण्यावर : मोठ्या ठिकाणी सभा घेऊन घालतात भुरळ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात सध्या नेटवर्क मार्केटिंग कंपनीचे जाळे सर्वदूर पसरले असून अतिरिक्त आर्थिक लाभाचे आमिष देऊन लाखोंची फसवणूक केली जात आहे. बेरोजगार व महत्वाकांक्षी तरूण टार्गेट केले जात आहे. भरपुर पैसा कमविण्याच्या नादात तरूण या कंपन्यांच्या जाळ्यात अडकत आहेत. स्वत:चा पैशातून खरेदी केलेल्या वस्तू कमिशन मिळविण्यासाठी सेल्समन सारखे घरोघरी वस्तू विकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.संबंधित मार्केटिंग कंपनीने निवडक परंतू बाजारात उपलब्ध नसलेल्या ब्रॅन्डशी टायअप करुन त्यांचे डेली निड्स, हेट्रा फुड, ब्युटी प्रोडक्टची किंमत एजंटच्या माध्यमातून विक्रीस उपलब्ध केली आहेत. हे सर्व प्रोडक्ट उच्चकोटी, आयुर्वेदिक, प्रमाणित, गुणवत्ताधारक असल्याची बतावणी करुन प्रत्येकाला फायदा होईल असे दावे केले जातात.संबंधित मार्केटिंग कंपनी मोठमोठ्या हॉटेल, क्लब हाऊस, सभागृहात मिटींग घेऊन एजंटच्या माध्यमातून ओळखीचे लोक, मित्रपरिवार यांना निमंत्रीत करतात. प्रत्येक आठवड्यात शनिवार किंवा रविवारी अशा सभा आयोजित करण्यात येतात. सभेत उपस्थितांना आपल्या जाळ्यात ओढण्याकरिता निरनिराळ्या पद्धतीने इम्प्रेस केले जाते.एखाद्या लिडरला एन्ट्रीपासून ते एक्झीटपर्यंत एखादा मोठा सेलिब्रेटी असल्याचे दाखवून हार पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला जाते. संबंधित कंपनीत मोठे पद असल्याचे सांगुन आठवड्याची कमाई लाखोंत असल्याची बतावणी करण्यात येते. नुकतीच मोठ्या ब्रॅन्डची कार भेट स्वरुपात मिळाली हे फोटोसहीत दाखविण्यात येते. जेणेकरुन यासर्वांची उपस्थितांना भुरळ पडते. आणि त्यांच्या जाळ्यात अडकतात. नवीन कुणी सावज फसताच त्याला लाखोंची वस्तू खरेदी करण्यास सांगून चॅनल वाढविण्याचे सल्ले देण्यात येतात. यात दिवसेंदिवस हजारो रुपयांची कमाई कमिशन मार्फत मिळवून देण्याची खात्री दिली जाते. आठवड्याभरातच लाखोंच्या वस्तूची विक्री करुन देऊ अशा भूलथापा देऊन विश्वास अर्जीत केला जातो.यासर्वांला बळी पडून बेरोजगार तरुण-तरुणी आपल्या जवळील पुंजी अशा खोट्या व्यवसायात लावतात आणि आमिषाला बळी पडून लाखोंचे नुकसन करुन बसतात. एकदा का त्यांनी नियोजित खात्यात पैसे जमा केला की त्यांच्याकडे सेल्समनचे काम लागेलच आणि कोणतीही मदत वा सहकार्य करण्यात येत नाही. हा सर्व प्रकार खुले आम सुरू असताना पोलीस मात्र कोणतीच कारवाई करीत नाही. त्यामुळे अशा कंपन्यांचे चांगलेच फवते.