आरोग्य धोक्यात : प्रशासनाचे उदासीन धोरण, दुर्गंधीयुक्त वातावरणविशाल रणदिवे अड्याळ जलव्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या माजी मालगुजारी तलावाची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे गोंडराजाच्या काळात बांधण्यात आलेल्या माजी मालगुजारी तलावाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. या तलावाचा उपयोग शेती उत्पादनासोबतच मासेमारी, सिंगाडे उत्पादन, जनावरांना पिण्याचे पाणी, कपडे दुधे आदी कामासाठी हे तलाव उपयुक्त होते. मामा तलाव निर्मिती करणाऱ्यांनी दूरदृष्टिकोन ठेऊवूाच यांची निर्मिती केली. मात्र आधुनिकी करणाच्या नावाखाली होत असलेला सरकारचा दुर्लक्षीतपणा यामुळे या तलावांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. मोठे सिंचन प्रकल्प तयार करण्याच्या मानसिकतेतुन या तलावावर दुरुस्ती करण्यात आली नाही. मागील कित्येक वर्षापासुन गोसे प्रकल्प, नेरला उपसा सिंचन पुर्णत्वास आणण्याचे काम सुरु आहे आणि त्यासाठी शेकडो, हजारोंच्या संख्येत कामगार वर्ग काम करीत आहेत. परंतु पुर्ण आजही झाले नाही. या गोसे प्रकल्पामुळे व नेरला उपसा सिंचनामुळे शेतजमीनीला सिंचन उपलब्ध होणार आहे. अड्याळ व परिसरात जेव्हा जेव्हा शेतजमीनीला एका पाण्याची गरज भासते तेव्हा या मामा तलावाची गरज भासते. ते काही प्रमाणात पुर्णही होते. शेतकऱ्यांचाही दुर्लक्षा होत असला तरी पदाधिकारी, समाजसेवक, नेतेमंडळी कुणीतरी याकडे लक्ष द्यायला पाहिजे. प्रकल्प जेव्हा पूर्ण होणार तेव्हा लाभ होणारच पंरतु जो आहे जो कधीही कुणाच्याही कामात पडू शकतो त्याकडे दुर्लक्ष करणे बरोबर नाहीच!अड्याळ येथील बाजार ग्राउंडकडे जाणाऱ्या मार्गाच्या बाजुकडील हा तलाव दुर्गंधीयुक्त आहे. शाळेत जाणारे विद्यार्थी व सभोवताल राहणारे ग्रामस्थ या दुर्गंधीचा रोजच त्रास सहन करवा लागतो. कित्येक वर्षापासुन मूर्तीचे विसर्जन होत असते. परंतु आजपावेतो या तलावातील गाळ उपसण्यात आला नाही. आजुबाजुला आता पक्के घरे बनली पंरतु त्या तलावाची सिमा रेषा रेकार्डवर दिसते प्रत्यक्षात दिसत नाही. याचे एकमेव कारण म्हणजे दुर्लक्ष. प्रशासनाला तेथील पदाधिकाऱ्याचे दुर्लक्ष होत आहे. अड्याळमध्ये या तलावांची संख्या चार आहे. यावर जिल्हा परिषदेचे हक्क असल्याचे बोलले जाते. परंतु याची सीमारेषा नसल्यामुळे येथेही अतिक्रमण आल्यासारखेच आहे. जिल्हा परिषदेने याकडे गांभीर्याने लक्ष घालुन ज्या तलावाची स्थिती दयनीय आहे किंवा ज्या तलावामुळे तेथील दुर्गंधीमुळे ग्रामस्थाचें आरोग्य धोक्यात आले आहे. अशा तलावातील गाट उपसा करणे, साफसफाई करणे, सुशोभीकरण करणे महत्त्वाचे झाले आहे. त्यामुळे या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
मालगुजारी तलावाचे अस्तित्व धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2016 01:20 IST