आॅनलाईन लोकमतभंडारा : जिल्हा परिषदेतंर्गत सन २०१८ मध्ये होणाºया सर्व संवर्गाच्या बदली प्रक्रियेबाबत लिपीक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर निवेदन देण्यात आले.निवेदनामध्ये, सर्व संवर्गाच्या प्रशासकीय, विनंती, आपसी बदल्यांची कार्यवाही रितसर नियमाप्रमाणे, पारदर्शी, सेवाजेष्ठतेनुसार, विहित वेळापत्रकानुसार करण्यात यावी व सेवा जेष्ठतेनुसार तयार करण्यात आलेली प्राथमिक यादी व अंतिम यादी संघटनेला पुरविण्यात यावी, प्राथमिक यादीमध्ये काही कर्मचाºयांचे आक्षेप अथवा तक्रारी असल्यास त्याचे निराकरण करून अंतिम यादी प्रसिद्ध करावी, याबदली प्रक्रियेस लिपीक संघटना सर्वतोपरी सहकार्य करेल, असे नमूद केले आहे. शिष्टमंडळाने अनेक समस्या अधिकाºयांसमोर मनमोकळेपणाने मांडल्या.शिष्टमंडळात अवी चेटुले, बी.एम. मदनकर, शिवशंकर रगडे, माया नागलवाडे, एस.एस. मुलकलवार, ए.आर. करपाते, घरडे, आर.एस. तिवारी, एस.डब्ल्यु. पाठक, एस.व्ही. बन्सोड, प्रिती गणवीर, एस.ए. राखडे, एम.एन. देखमुख, डी.डी. निनावे, एस.डी. भलावी, व्ही.व्ही. पवार, व्ही.एस. विघे, शंतनु व्यवहारे, अजय रामटेके, प्रदिप राऊत, चौधरी, रामभाऊ येवले, अशोक बुरडे, कमलेश बोरकर, प्रफुल्ल घरडे, शहारे व इतर लिपीक उपस्थित होते.
सर्व संवर्गाची बदली प्रक्रिया पारदर्शी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 23:37 IST
जिल्हा परिषदेतंर्गत सन २०१८ मध्ये होणाºया सर्व संवर्गाच्या बदली प्रक्रियेबाबत लिपीक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर निवेदन देण्यात आले.
सर्व संवर्गाची बदली प्रक्रिया पारदर्शी करा
ठळक मुद्देउपमुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन : लिपिक संघटनेची मागणी