शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

‘स्मार्ट सिटी’ बनविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2017 00:29 IST

शहराला लागलेले अस्वच्छतेचे ग्रहण पुसून काढू.

पदग्रहण समारोह : नगराध्यक्ष मेंढे यांची ग्वाहीभंडारा : शहराला लागलेले अस्वच्छतेचे ग्रहण पुसून काढू. येत्या पाच वर्षात शहरातील रस्ते, पिण्याचे पाणी, गटार योजना यांचे भरीव कामे करुन शहराचा चेहरा-मोहरा बदलविण्याचा संकल्प नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी व्यक्त केला.‘स्मार्ट सिटी’ ही संकल्पना भंडारा शहरात राबविताना बेरोजगारांचा हाताला रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीनेही विकास कामे खेचून आणू अशी ग्वाही मेंढे यांनी पदग्रहण समारंभ प्रसंगी दिली. भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित शहरातील एका सभागृहात ते उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी आमदार अनिल सोले, आमदार चरण वाघमारे, आमदार रामचंद्र अवसरे, भाजप जिल्हाध्यक्ष तारिक कुरेशी, तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, डॉ. उल्हास फडके, रामभाऊ चाचेरे, युगकांता रहांगडाले, चंदु रोकडे, हेमंत देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी मेंढे यांनी, मतदारांनी नगराध्यक्ष पदावर निवड करुन माझ्यावर एक मोठी जबाबदारी सोपविली आहे. यासाठी बरेच कार्य करावे लागणार असल्याची जाणीव मला असून येत्या पाच वर्षात शहराचा चेहरा-मोहरा बदलविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. नागरिकांनी भाजपवर टाकलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी माझे सर्व सहकारी नगरसेवक विकास कामे करण्यात कुठेही कमी पडणार नाही. शहर स्वच्छ व सुंदर करुन नागरिकांना नागरी आरोग्य पुरविण्यावर भर देवू.शहरातील मुलभूत सुविधांपैकी पिण्याचे पाणी, रस्ता, गटार योजना यासह अन्य सुविधा पुरविण्यात आमचा भर राहणार आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवठा करणारी योजना जुनी झाली असून काही ठिकाणी नव्याने पाईप लाईन टाकण्याची आता गरज आहे. स्वच्छ व आरोग्यास हितकारक असे शुध्द पाणी नागरिकांना मिळावे यासाठी उपायोजना करण्यात येईल. शहरातील घनकचरा निर्मुलन आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी गटार योजना राबवायची आहे. यातून प्रक्रिया करुन मिळालेल्या शुध्द पाण्याचा पुनर्वापर करणे शक्य होईल. या कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे. शहरातील वेगवेगळ्या प्रभागात मुलांसाठी खेळांचे मैदान, बगीचा, वृध्दांसाठी विरंगुळा केंद्र, बेघर नागरिकांसाठी पंतप्रधान आवास योजनेतून घराचे बांधकाम करण्यात येईल असा मानस त्यांनी व्यक्त केला. यावेळी वेबसाईटचे लोकार्पण आमदार अनिल सोले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या मदतीने शहरातील नागरिक आपली तक्रार थेट नगराध्यक्षांपर्यंत पोहचू शकतील. यावेळी आमदार सोले यांनी, भंडारा शहराच्या विकासाकरिता शक्य ती मदत करणार असल्याचे सांगितले यावेळी उपस्थित मान्यवरांची समायोचित भाषणे झाली. कार्यक्रमाला शहरातील माजी नगरसेवकांसह विद्यमान नगरसेवकांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन चैतन्य उमाळकर यांनी केले. यावेळी भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)