धान उचलण्याची व्यवस्था तात्काळ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 06:00 AM2020-01-04T06:00:00+5:302020-01-04T06:00:28+5:30

आमगाव (दिघोरी) व लाखनी येथे धान खरेदी केंद्राची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी आमदार राजू कारेमोरे, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव सुपे, पणन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक योगेश म्हसे, जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन, माजी आमदार नाना पंचबुद्धे, तहसीलदार अक्षय पोयाम, जिल्हा पणन अधिकारी खाडे, दुध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी व शेतकरी यावेळी उपस्थित होते.

Make arrangements for paddy lifting immediately | धान उचलण्याची व्यवस्था तात्काळ करा

धान उचलण्याची व्यवस्था तात्काळ करा

Next
ठळक मुद्देनाना पटोले : आमगाव, लाखनी, साकोली येथे धान खरेदी केंद्राची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : धान खरेदी केंद्रावर आलेले शेतकऱ्यांचे धान तत्काळ खरेदी करण्याची व्यवस्था करण्यात यावी. आॅनलाईन ऐवजी आॅफलाईन धान उचलण्यात यावे, तसेच धान खरेदी व्यवस्थेत शेतकऱ्यांचा फायदा करणारी व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रशासनाला दिल्या.
आमगाव (दिघोरी) व लाखनी येथे धान खरेदी केंद्राची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी आमदार राजू कारेमोरे, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव सुपे, पणन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक योगेश म्हसे, जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन, माजी आमदार नाना पंचबुद्धे, तहसीलदार अक्षय पोयाम, जिल्हा पणन अधिकारी खाडे, दुध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी व शेतकरी यावेळी उपस्थित होते.
भंडारा तालुक्यातील आमगाव, कृषी उत्पन्न बाजार समिती लाखनी व श्रीराम भात गिरणी साकोली येथे त्यांनी भेट देऊन पाहणी केली. अवकाळी पावसामुळे धान खरेदी केंद्रावर आलेले शेतकऱ्यांचे धान खराब होता कामा नये, याची काळजी घेण्यात यावी, अशा सूचना नाना पटोले यांनी केल्या. शेतकऱ्यांचे धान मोजून घेण्यास विलंब होत असल्याने धान ओला होऊन खराब होत असल्याचे ते म्हणाले. आॅनलाईन धान खरेदीत तांत्रिक अडचण येत असल्याने उशीर होत आहे. ही अडचण लक्षात घेता आॅनलाइन खरेदी तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
पुढील वर्षांपासून धान खरेदी व्यवस्थेत सुधारणा करण्यात येणार असून शेतकºयांच्या मोबाईलवर टोकण नंबर देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्याचप्रमाणे धान खरेदी व मिलींग सोबतच करण्यात येईल अशी व्यवस्था निर्माण केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांचे धान अनेक दिवस पडून राहणार नाही. खरेदी प्रक्रिया अधिक सोपी व सुटसुटीत करण्यावर भर दिला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
धान खरेदी केंदावर अतिरिक्त हमाली घेण्यात येत असल्याची बाब काही शेतकऱ्यांनी लक्षात आणून दिली असता शेतकऱ्यांच्या खिशाला हात लागणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना पटोले यांनी यावेळी केल्या. गोदाम बांधकामाचा आराखडा तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या भेटीत नाना पटोले यांनी शेतकरी व खरेदी संस्था यांचे प्रश्न व समस्या जाणून घेतल्या.

Web Title: Make arrangements for paddy lifting immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.