Maharashtra Election 2019 ; तीन मतदारसंघात २४ उमेदवारांचे नामांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 06:00 AM2019-10-04T06:00:00+5:302019-10-04T06:00:35+5:30

साकोलीचे विद्यमान भाजप आमदार बाळा काशिवार यांची तिकीट पक्षाने कापली असून तेथे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांना उमेदवारी दिली आहे. गुरुवारी सायंकाळी भाजपने तिसरी यादी घोषित केली. त्यात जिल्ह्यातील केवळ साकोली विधानसभेची उमेदवारी घोषित झाली असून तुमसर येथील उमेदवाराचा नावाचा संभ्रम कायम होता.

Maharashtra Election 2019 ; Nomination of 3 candidates in three constituencies | Maharashtra Election 2019 ; तीन मतदारसंघात २४ उमेदवारांचे नामांकन

Maharashtra Election 2019 ; तीन मतदारसंघात २४ उमेदवारांचे नामांकन

Next
ठळक मुद्देआज अंतिम तारीख : तुमसरच्या उमेदवारीचा संभ्रम कायमच

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील तीन मतदारसंघात गुरवारपर्यंत २४ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले असून उद्या शुक्रवार हा नामांकनाची अंतिम तारीख आहे. प्रमुख उमेदवार शक्ती प्रदर्शन करीत नामांकन दाखल करणार आहेत. भाजपने साकोली विधानसभेसाठी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या नावाची घोषणा केली असून तुमसरच्या उमेदवारीचा मात्र संभ्रम कायम होता.
विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरुन तीनही मतदार संघात प्रचंड घमासान सुरु आहे. शेवटचा दिवस आला तरी बहुतांश ठिकाणी उमेदवारांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. त्यामुळेच पहिल्या चार दिवसात नामांकन दाखल करणाऱ्यांची संख्या अत्यल्प होती. जिल्ह्यातील तुमसर, भंडारा आणि साकोली विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत २४ उमेदवारांनी ३८ नामांकन दाखल केले आहे. तुमसर मतदारसंघात सहा नामांकन दाखल झाले आहे. त्यात अपक्ष के. के. पंचबुद्धे, सदाशिव शिवा ढेंगे, भोलाराम मानिक परशुरामकर तर अपक्ष आणि भाजपकडून चरण वाघमारे यांच्यासह अपक्ष व राष्ट्रवादी तर्फे राजकुमार माटे तर बहुजन मुक्तीपार्टीकडून रविदास श्रावण लोखंडे यांनी नामांकन दाखल केले आहे.
भंडारा विधानसभा क्षेत्रात चवथ्या दिवशी नामांकनाचा श्रीगणेशा झाला. तीन दिवस एकही नामांकन दाखल झाले नव्हते. आठ उमेदवारांनी नामांकन दाखल केले. त्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे जयदिप जोगेंद्र कवाडे, अपक्ष प्रशांत बालक रामटेके, नितीन सूर्यभान बागडे, अजय प्रेमदास रंगारी, सदानंदा जागोजी कोचे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे नितीन मनोज बोरकर, भाकपतर्फे हिवराज भिकुलाल उके आणि लोकराज पार्टीतर्फे सुरेश मारोती भवसागर यांनी नामांकन दाखल केले.
साकोली विधानसभा क्षेत्रात दहा नामांकन दाखल झाले असून त्यात भाजपतर्फे डॉ. परिणय फुके आणि अपक्ष व भाजपतर्फे राजेश काशीवार, अपक्ष डॉ. ब्रम्हानंद करंजेकर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व अपक्ष म्हणून प्रकाश हरिचंद्र देशकर, अण्णा श्रीराम फटे यांच्यासह बळीराजा पार्टीच्या उर्मिला प्रशांत आगाशे, वंचित बहुजन आघाडी चंद्रशेखर शामराव टेंभुर्णे, अपक्ष सुभाष रामचंद्र बावनकुळे, सुहास फुंडे, अतुल परशुरामकर यांनी नामांकन दाखल केले आहे.
तीनही मतदारसंघात शुक्रवारी नामांकन दाखल करण्यासाठी मोठी गर्दी उसळणार आहे. तसेच शक्ती प्रदर्शनही केले जाणार आहे.

साकोलीच्या भाजप आमदाराचे तिकीट कापले
साकोलीचे विद्यमान भाजप आमदार बाळा काशिवार यांची तिकीट पक्षाने कापली असून तेथे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांना उमेदवारी दिली आहे. गुरुवारी सायंकाळी भाजपने तिसरी यादी घोषित केली. त्यात जिल्ह्यातील केवळ साकोली विधानसभेची उमेदवारी घोषित झाली असून तुमसर येथील उमेदवाराचा नावाचा संभ्रम कायम होता.

अधिकृत उमेदवारांच्या नावांच्या घोषणेची प्रतीक्षा
महायुतीत भंडारा विधानसभा रिपाइंच्या आठवले गटाला तर आघाडी पिरिपाच्या कवाडे गटाला देण्यात आला आहे. अद्यापपर्यंत उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली नसली तरी महायुतीतर्फे जिल्हा परिषद सदस्य अरविंद भालाधरे यांचे नाव निश्चित मानले जात आहे. तर आघाडीतर्फे जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी गुरुवारी नामांकन दाखल केले आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर अपक्ष म्हणून नामांकन दाखल करणार आहे. तुमसर विधानसभा मतदारसंघात युती आणि आघाडीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा गुरुवारी सायंकाळपर्यंत करण्यात आली नव्हती. मात्र आघाडीतर्फे राजु कारेमोरे यांचे नाव निश्चित मानले जात आहे. युतीच्या उमेदवार वेळेवर निश्चित होईल असे सांगितले जात आहे.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Nomination of 3 candidates in three constituencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :tumsar-acतुमसर