शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

Maharashtra Election 2019 ; अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे यांनी मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 6:00 AM

२३ व्या फेरीपर्यंत निकालात चुरस पहायला मिळाली. त्यानंतर मात्र राष्ट्रवादीच्या कारेमोरे यांनी आघाडी कायम ठेवली. राजू कारेमोरे यांना ८७,१९०, अपक्ष चरण वाघमारे यांना ७९,४९० तर भाजपचे प्रदीप पडोळे यांना ३३४५७ मते मिळाली. तुमसर मतदारसंघातून एकूण दहा उमेदवार रिंगणात होते. विद्यमान आमदार चरण वाघमारे यांना भाजपने तिकीट नाकारल्याने त्यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल केली.

ठळक मुद्दे७,७३९ मतांची आघाडी : भाजपचे प्रदीप पडोळे तिसऱ्यास्थानी

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणाऱ्या तुमसर मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे यांनी अपक्ष उमेदवार चरण वाघमारे यांचा ७,७३९ मतांनी पराभव केला. भाजपचे प्रदीप पडोळे यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.२३ व्या फेरीपर्यंत निकालात चुरस पहायला मिळाली. त्यानंतर मात्र राष्ट्रवादीच्या कारेमोरे यांनी आघाडी कायम ठेवली. राजू कारेमोरे यांना ८७,१९०, अपक्ष चरण वाघमारे यांना ७९,४९० तर भाजपचे प्रदीप पडोळे यांना ३३४५७ मते मिळाली. तुमसर मतदारसंघातून एकूण दहा उमेदवार रिंगणात होते. विद्यमान आमदार चरण वाघमारे यांना भाजपने तिकीट नाकारल्याने त्यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल केली. राष्ट्रवादीमध्येही तिकीटावरून प्रचंड रस्सीखेच सुरू होती. अखेर राष्ट्रवादीने राजू कारेमोरे यांना तिकीट दिली. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष योगेश सिंगनजुडे, माजी आमदार अनिल बावणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतरही महाआघाडीने हा किल्ला लढवित काबिज केला.उत्कंठा शिगेला पोहचल्याने काहीकाळ तणाव असल्याचेही दिसून येत होते. पहिली ते २६ व्या फेरीपर्यंत चुरस पहायला मिळाली. प्रत्येक फेरीनंतर कोण आघाडी घेणार, अशी स्थिती दिसत होती. तुमसर शहरातून निर्णायक स्थिती निर्माण होईल, असे वाटत होते. मात्र येथे भाजप तिसºया क्रमांकावर तर कारेमोरे व वाघमारे यांना चांगली मते मिळाली.87,190मिळाली मतेविजयाची तीन कारणे...1महाआघाडीचे उमेदवार तथा नवीन चेहरा म्हणून राजू कारेमोरे यांना मतदारांनी पसंती दिली. राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते म्हणून त्यांची मतदारसंघात ओळख कामाला आली.2नागरिकांच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी नेहमी असणारी धडपड कारेमोरेंच्या स्वभावात आहे.3बंडखोरीचा तसा पूर्ण फायदा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळाल्याचे म्हटले जाते. कामाप्रती समर्पणता ही बाब कारेमोरे यांच्या विजयासाठी कारणीभूत ठरली.

टॅग्स :bhandara-acभंडारा