लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणाऱ्या तुमसर मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे यांनी अपक्ष उमेदवार चरण वाघमारे यांचा ७,७३९ मतांनी पराभव केला. भाजपचे प्रदीप पडोळे यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.२३ व्या फेरीपर्यंत निकालात चुरस पहायला मिळाली. त्यानंतर मात्र राष्ट्रवादीच्या कारेमोरे यांनी आघाडी कायम ठेवली. राजू कारेमोरे यांना ८७,१९०, अपक्ष चरण वाघमारे यांना ७९,४९० तर भाजपचे प्रदीप पडोळे यांना ३३४५७ मते मिळाली. तुमसर मतदारसंघातून एकूण दहा उमेदवार रिंगणात होते. विद्यमान आमदार चरण वाघमारे यांना भाजपने तिकीट नाकारल्याने त्यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल केली. राष्ट्रवादीमध्येही तिकीटावरून प्रचंड रस्सीखेच सुरू होती. अखेर राष्ट्रवादीने राजू कारेमोरे यांना तिकीट दिली. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष योगेश सिंगनजुडे, माजी आमदार अनिल बावणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतरही महाआघाडीने हा किल्ला लढवित काबिज केला.उत्कंठा शिगेला पोहचल्याने काहीकाळ तणाव असल्याचेही दिसून येत होते. पहिली ते २६ व्या फेरीपर्यंत चुरस पहायला मिळाली. प्रत्येक फेरीनंतर कोण आघाडी घेणार, अशी स्थिती दिसत होती. तुमसर शहरातून निर्णायक स्थिती निर्माण होईल, असे वाटत होते. मात्र येथे भाजप तिसºया क्रमांकावर तर कारेमोरे व वाघमारे यांना चांगली मते मिळाली.87,190मिळाली मतेविजयाची तीन कारणे...1महाआघाडीचे उमेदवार तथा नवीन चेहरा म्हणून राजू कारेमोरे यांना मतदारांनी पसंती दिली. राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते म्हणून त्यांची मतदारसंघात ओळख कामाला आली.2नागरिकांच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी नेहमी असणारी धडपड कारेमोरेंच्या स्वभावात आहे.3बंडखोरीचा तसा पूर्ण फायदा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळाल्याचे म्हटले जाते. कामाप्रती समर्पणता ही बाब कारेमोरे यांच्या विजयासाठी कारणीभूत ठरली.
Maharashtra Election 2019 ; अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे यांनी मारली बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 06:00 IST
२३ व्या फेरीपर्यंत निकालात चुरस पहायला मिळाली. त्यानंतर मात्र राष्ट्रवादीच्या कारेमोरे यांनी आघाडी कायम ठेवली. राजू कारेमोरे यांना ८७,१९०, अपक्ष चरण वाघमारे यांना ७९,४९० तर भाजपचे प्रदीप पडोळे यांना ३३४५७ मते मिळाली. तुमसर मतदारसंघातून एकूण दहा उमेदवार रिंगणात होते. विद्यमान आमदार चरण वाघमारे यांना भाजपने तिकीट नाकारल्याने त्यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल केली.
Maharashtra Election 2019 ; अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे यांनी मारली बाजी
ठळक मुद्दे७,७३९ मतांची आघाडी : भाजपचे प्रदीप पडोळे तिसऱ्यास्थानी