लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : संपूर्ण कर्जमाफीची गरज असतांना युती सरकारने कर्जमाफी दिली नाही. शेतकरी हतबल झाला आहे. आमचे सरकार सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊ असे राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे तुमसर मतदार संघातील उमेदवार राजू कारेमारे यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील मांडेसर येथे आयोजित राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, धनंजय दलाल, माजी खासदार मधुकर कुकडे, वासुदेव बांते, सीमा भुरे, आशीष पात्रे, राजु माटे, माधव बांते, श्रीकृष्ण पडोळे, रमेश पारधी, प्रमोद तितीरमारे, देवचंद ठाकरे उपस्थित होते.यावेळी बोलताना खासदार पटेल म्हणाले, शेतकरी हतबल आहे. युवकांना रोजगार नाही, गॅस, वीज बिलाचे भाव वाढत आहेत. डिझेल आणि खताचे भाव वाढविले. मात्र दुधाचे भाव वाढत नाही. जीएसटी लावली. पेट्या वाटून जनतेला मुर्ख बनविण्याचे काम सुरु आहे. जनतेचे लक्ष विचलीत करण्याचे प्रयत्न आहे. पुढारीच रेतीचा व्यवसाय चोरट्या मार्गाने करीत आहे. महिलांचा अपमान करणारे बाहेर सभा लावून हिरोगिरी करीत अशा अनेक कारणांमुळे जनतेत संताप निर्माण झाला असून या सारकारला जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.यावेळी प्रभु मोहतुरे, सुनील गिऱ्हेपुंजे, देविदास लांजेवार, रिता हलमारे, कमलेश कनोजे, विना झंझाड, सदाशिव ढेंगे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.मोहाडीत प्रचार कार्यालयाचे उद्घाटनकाँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार राजू कारेमोरे यांच्या मोहाडी येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. कार्यकर्त्यांनी एक संघ राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार राजू कारेमोरे यांचा विजय साजरा करा, असे आवाहन केले. यावेळी उमेदवार राजू कारेमोरे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे, माजी खासदार मधुकर कुकडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Maharashtra Election 2019 ; सरकार आल्यास शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 06:00 IST
लोकमत न्यूज नेटवर्क मोहाडी : संपूर्ण कर्जमाफीची गरज असतांना युती सरकारने कर्जमाफी दिली नाही. शेतकरी हतबल झाला आहे. आमचे ...
Maharashtra Election 2019 ; सरकार आल्यास शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी
ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : मांडेसर येथे राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळावा