शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

ओबीसी पायलट प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांवर 'महाज्योती'चा अन्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 14:39 IST

मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा : ओबीसी सेवा संघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : ओबीसी पायलट प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांवर महाज्योती व संबंधित संस्थेमार्फत घोर अन्याय करण्यात आला आहे. अन्यायग्रस्त विद्यार्थी उपराजधानी नागपूर शहरात तीन दिवसांपासून आमरण उपोषण करीत आहेत. अन्नपाण्याविना आत्मक्लेश करून न्यायाची मागणी करीत आहेत. मात्र, शासनाने अद्यापही दखल घेतली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने दखल घ्यावी, विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशा मागणीचे निवेदन गुरुवारला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ओबीसी सेवा संघाच्या वतीने पाठविण्यात आले आहे.

संविधान चौक नागपूर येथे वैमानिक प्रशिक्षण घेणाऱ्या महाज्योती संस्थेचे १४ ओबीसी विद्यार्थी आमरण उपोषणाला बसले आहेत. १ नोव्हेंबर २०२२ ला वैमानिक प्रशिक्षण सुरू झाले. हे प्रशिक्षण १८ महिन्यांचे होते. प्रशिक्षण नागपूर येथील फ्लाईंग क्लब येथे सुरू आहे. या फ्लाईंग क्लबच्या ट्रस्टी नागपूर विभागीय आयुक्त आहेत. या प्रशिक्षणासाठी प्रति विद्यार्थी २५ लाखप्रमाणे ५ करोड रुपये फ्लाईंग क्लब नागपूर यांना देण्यात आलेले आहेत. या प्रशिक्षणात २०० तास हवाई उड्डाण होणे आवश्यक आहे. हवाई उड्डाण तास पूर्ण झाल्यानंतरच सी.पी.एल. अभ्यासक्रम पूर्ण होतो. यानंतरच विद्यार्थ्यांना नोकरी मिळते. परंतु, मागील दोन वर्षांत अनेक विद्यार्थ्यांचे नगण्य हवाई उड्डाण तास प्रशिक्षण झाले. विद्यार्थ्यांनी अनेक वेळा महायुती आणि नागपूर फ्लाईंग क्लब यांना निवेदने दिली. विभागीय आयुक्त, फ्लाईंग क्लब नागपूर, महाज्योती आणि विद्यार्थी व पालक यांच्या अनेकदा बैठका झाल्यात. परंतु, उड्डाण तास अद्यापही पूर्ण झाले नाहीत. 

निवेदन देतेवेळी ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष गोपाल सेलोकर, भय्याजी लांबट, प्रभाकर वैरागडे, संजीव बोरकर, रोशन उरकुडे, रमेश शहारे, अरुण जगनाडे, भाऊराव वंजारी, मंगला वाडीभस्मे, ललिता देशमुख, शुभदा झंझाड, लता बोरकर, लक्ष्मण ईश्वरकर, मनिराम साखरकर, पंजाब कारेमोरे, श्रीपत भुरे, मेघराज बोंदरे, गोपाल देशमुख, राजू वंजारी आदी उपस्थित होते. 

विद्यार्थ्यांचे २०० तासांचे प्रशिक्षण पूर्ण करा वैमानिक प्रशिक्षण खासगी संस्थांमध्ये एक वर्षाचे आहे. असे असताना नागपूर फ्लाईंग क्लबने २३ महिन्यांतही हे प्रशिक्षण पूर्ण केले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा नागपूर फ्लाईंग क्लबवरील विश्वास उडाला आहे. वेगळे प्रशिक्षण केंद्र प्रशिक्षण पूर्ण करावे, अशी मागणी आहे.

टॅग्स :bhandara-acभंडारा