शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
5
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
6
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
7
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
8
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
9
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
10
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
11
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
12
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
13
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
14
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
15
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
16
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
17
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
18
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
19
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
20
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा

धावता ट्रॅक्टरसोडून मॅग्नीज चोरांनी काढला पळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 06:00 IST

माहितीनुसार मॉयल येथील डोंगरी बु. खाण परिसरात उच्च कोटीचे मॅग्नीज आहे. याच परिसरातून तस्कर मॅग्नीजची अवैध वाहतुक करित असतात. याच्यावर सुरक्षा रक्षक असलेल्या पेट्रोलींग पथकाची नेहमी करडी नजर असते. रविवारी सकाळी असाच थरारक प्रकार सुरक्षा रक्षकांसमोर घडला.

ठळक मुद्दे११ टन मॅग्नीज जप्त : गोबरवाही जंगल शिवारातील प्रकार, ८ जणांचा समावेश, तपासणी पथकाने केला पाठलाग

लोकमत न्यूज नेटवर्कगोबरवाही : तुमसर तालुक्यातील बाळापूर (डोंगरी बु.) खाण परिसरातून उच्च कोटीच्या मॅग्नीजची वाहतुक करित असताना पेट्रोलींग पथकाने पाठलाग केल्यानंतर धावता ट्रॅक्टर सोडून आठ मॅग्नीज चोरट्यांनी जंगलात पळ काढला. विशेष म्हणजे तपासणी पथकातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला. यात त्यांच्यात झडपही झाली. ही घटना रविवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास मॉयल परिसराला लागून असलेल्या गोबरवाही जंगल शिवारात घडली.माहितीनुसार मॉयल येथील डोंगरी बु. खाण परिसरात उच्च कोटीचे मॅग्नीज आहे. याच परिसरातून तस्कर मॅग्नीजची अवैध वाहतुक करित असतात. याच्यावर सुरक्षा रक्षक असलेल्या पेट्रोलींग पथकाची नेहमी करडी नजर असते. रविवारी सकाळी असाच थरारक प्रकार सुरक्षा रक्षकांसमोर घडला.बाळापूर (डोंगरी) परिसरातून ट्रॅक्टरमधून ११ टन मॅग्नीजची अवैधरित्या वाहतुक होत असल्याची माहिती पथकाला प्राप्त झाली. याच वेळी पेट्रोलिंगवर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी ट्रॅक्टरचा पाठलाग केला. सुरक्षारक्षक पाठलाग करित असल्याचे लक्षात येताच. ट्रॅक्टर क्र. एम एच ३६ झेड १७९२ मध्ये बसलेले सहा ते सात इसमांनी धावत्या ट्रॅक्टरमधून उडी घेतली. मागे असलेल्या पथकाने ट्रॅक्टर चालकाला थांबण्याची सुचना केली. मात्र त्याने ऐकले नाही. क्षणभराच्या आतच ट्रॅक्टर चालकानेही उडी घेवून जंगलाच्या दिशेने पळ काढला. विना चालक असलेला ट्रॅक्टर काही वेळातच सखल भागात असलेल्या झुडपांमध्ये जाऊन कोसळला.ट्रॅक्टर उलटताच घटनास्थळी सुरक्षारक्षकांचे पथकही पोहोचले. याचवेळी सर्वातप्रथम ट्रॅक्टरमधून उडी घेतलेल्या सहा ते सात जण तिथेच लपून बसले होते. सुरक्षा रक्षक तसेच या चोरट्यांमध्ये झडपही झाली. सुरक्षा रक्षकांवर दगडफेक करुन त्यांना पांगविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सुरक्षा रक्षकांनी चोख प्रतीउत्तर दिल्याने ट्रॅक्टरचालकासह आठ मॅग्नीज चोरट्यांनी तेथून पळ काढला. याबाबत मॉयलच्या सुरक्षा निरीक्षकांनी गोबरवाही पुलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनास्थळाहून रक्षकांनी २ लाख रुपये किंमतीचे ११ टन मॅग्नीज जप्त केले आहे. सदर ट्रॅक्टर गणेशपूर येथील एका व्यक्तीचे असल्याचे सांगण्यात येते. तपास सुरु असून या घटनेची तालुक्यात दिवसभर चर्चा होती.

टॅग्स :Thiefचोर