शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेशातील सात्यांची तुमसरात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 01:14 IST

ग्रामीणसह शहरी भागात सात्या-भोंबुड्या हे नाव सुपरिचित आहे. मंगळवारी मध्यप्रदेशातील तिरोडी, महकेपार जंगलातून मोठ्या प्रमाणात सात्या तुमसरात विक्रीला आल्या होत्या. श्रीराम नगरात मुख्य रस्त्यावर सात्या विक्रीची दुकाने होती. ३६० रूपये प्रति किलो असा सात्यांचा भाव होता.

ठळक मुद्देभंडारा-गोंदिया जिल्ह्यात लाखोंची उलाढाल : प्रथिनांचे भांडार, ग्राहकांच्या उड्या

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : ग्रामीणसह शहरी भागात सात्या-भोंबुड्या हे नाव सुपरिचित आहे. मंगळवारी मध्यप्रदेशातील तिरोडी, महकेपार जंगलातून मोठ्या प्रमाणात सात्या तुमसरात विक्रीला आल्या होत्या. श्रीराम नगरात मुख्य रस्त्यावर सात्या विक्रीची दुकाने होती. ३६० रूपये प्रति किलो असा सात्यांचा भाव होता. खवय्यांची मोठी गर्दी येथे झाली होती. भाज्यांची राणी म्हणून सात्यांची ओळख आहे.सात्याला मशरूम अळंबी असेही म्हटले जाते. आरोग्याकरिता अतिशय गुणकारी सात्यांना मानले जाते. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात सीमावर्ती मध्यप्रदेशातील बालाघाट, वाराशिवनी, तिरोडी महकेपार येथून सात्या विक्रीला येतात. दरवर्षी लाखोंची उलाढाल होते. दोन्ही जिल्ह्यात सात्यांचा व्यापारही लाखोंच्या घरात आहे. पावसाळ्यात नैसर्गीक सात्या मोठ्या प्रमाणात विक्रीला आणल्या जातात. सध्या त्यांचा भाव ३६० रूपये किलोग्रॅम आहे. तरी सात्या खरेदीसाठी ग्राहकांच्या उड्या पडतात. सात्यांचे कृत्रिम पद्धतीनेही उत्पादन घेण्यात येते. त्याचे भंडारा व गोंदिया जिल्ह्यात प्रकल्प आहेत, परंतु शेतातील डुंभरावर व जंगलातील डुंबरावरील नैसर्गीक सात्यांची चव वेगळीच असते. जुलै व आॅगस्ट महिन्यात ढगांचा गडगडाट झाला तर बांधावर व जंगलातील डुंभर फूटून त्यातील सात्या बाहेर येतात. अगदी लहान आकाराचे त्याचे बोंड असते. डुंबरातून उखडून त्यांना बाजारात विक्रीला आणतात.शेतात काम करणारे तथा जंगलात फेरफटका मारणोर लोक पावसाळ्यात डुंबराकडे जावून सात्या शोधण्याचे काम करतात. याकरिता ते परिश्रम करतात.सात्या काढणे धोकादायकशेतातून तथा जंगलातून सात्या उखडून काढणे तसे अत्यंत धोकादायक काम आहे. सात्या काढताना अनेकदा सर्पदंश झाल्याच्या आणि काही जण यात मृत्युमुखी पडले आहेत. सात्या विक्रीतून कमाईपोटी अनेक जण ही जोखीची कामे ग्रामीण भागात करीत आहेत.व्हिटॅमिनचे भांडारसात्यामध्ये व्हिटॅमिनचे भांडार असते. यात प्रोटीन, व्हिटॅमीन, फायबर, अमीनो अ‍ॅसिड, झिंक, कॅलशियम, मॅग्नेशियम, जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. शहरात नैसर्गिक सात्यांना प्रचंड मागणी आहे. तुमसर शहर व परिसरात सात्या विक्रीत लाखोंची उलाढाल दरवर्षी होते, हे विशेष.

टॅग्स :vegetableभाज्या