शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व विदर्भातील प्रकल्पांमध्ये अत्यल्प जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 12:43 IST

पर्जन्यमानात आघाडीवर असणाऱ्या पूर्व विदर्भातील प्रकल्पांमध्ये यावर्षीच्या मान्सून सत्रात अत्यल्प पाणीसाठा आहे. एकट्या भंडारा जिल्ह्यात ६३ प्रकल्पांतर्गत ३६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.

ठळक मुद्देदमदार पावसाची प्रतीक्षा ३६ टक्के पाण्याने भागणार कसे?

लोकमत न्यूज नेटवर्कइंद्रपाल कटकवारभंडारा : पर्जन्यमानात आघाडीवर असणाऱ्या पूर्व विदर्भातील प्रकल्पांमध्ये यावर्षीच्या मान्सून सत्रात अत्यल्प पाणीसाठा आहे. एकट्या भंडारा जिल्ह्यात ६३ प्रकल्पांतर्गत ३६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. परिणामी पावसाने दगा दिल्यास नागरिकांसह शेतीलाही याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे.पूर्व विदर्भातील भंडारा व गोंदिया जिल्ह्यात तलावांची मोठी संख्या आहे. अडीच हजारांपेक्षा जास्त तलाव असले तरी त्यात माजी मालगुजारी तलावांची अवस्था हवी तेवढी चांगली नाही. पावसाळ्यात तलावांसह बोड्या व प्रकल्पांमध्ये पाणी साठवणूक होत असते. यावर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र, त्यानंतर ेपावसाने पाठ फिरविल्यामुळे प्रकल्पांमध्येही पाणी साठा होवू शकला नाही. भंडारा जिल्ह्यातील जीवनदायीनी समजल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीत मध्यप्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात बरसणाऱ्या पावसाचे पाणी धरणांमार्फत सोडले जाते. यावर्षी मात्र तशी स्थिती ओढवली नाही. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सरासरी १९ टक्के पाऊस कमी झाला.भंडारा जिल्ह्यात ६३ प्रकल्प असून त्यात चार मध्यम प्रकल्प, ३१ लघु प्रकल्प तर २८ माजी मालगुजारी तलाव आहेत. हे सर्व प्रकल्प लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येत असून वन व अन्य विभागांच्या हद्दीत असलेल्या तलावांची संख्या वेगळी आहे.पावसाने दगा दिल्यामुळे सद्यस्थितीत मध्यम प्रकल्पांमध्ये ३० टक्के तर लघु प्रकल्पात ३९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. दोन महिने पूर्ण झाल्यावरही जिल्ह्यातील प्रकल्पांनी निम्मी टक्केवारीही ओलांडलेली नाही. पाऊस नसल्यामुळे रोवणी व धान पीकाकरिता पहिल्यांदाच बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्यात येणार आहे.धरणाची स्थितीही चिंताजनकभंडारापेक्षा गोंदिया जिल्ह्यात धरणांची संख्या अधिक असली तरी दोन्ही जिल्ह्यात पर्जन्यमानाचे प्रमाण यावर्षी कमी आहे. परिणामी गोंदिया जिल्ह्यातील ईटियाडोह, सिरपूर, कालीसराड, धापेवाडा, वैनगंगा देवरी आदी धरण क्षेत्रात अपेक्षित जलसाठ्यापेक्षा पाण्याची टक्केवारी कमी आहे. याशिवाय मध्यप्रदेशातील संजय सरोवरात ४१० दलघमी जलसाठा अपेक्षित असताना आजघडीला फक्त १९८ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. महत्वाकांक्षी गोसीखुर्द धरणात ११४६ दलघमी जलसाठा अपेक्षित असताना १८८.०४ पाणीसाठा उपलब्ध आहे. या दोन्ही धरणांची टक्केवारी अनुक्रमे ४८ व २५ अशी आहे. सद्यस्थितीत भंडारा शहराच्या हाकेवर असलेल्या वैनगंगा नदीची पातळी ५.१७ मीटर इतकी आहे.

टॅग्स :agricultureशेतीWaterपाणी