शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या संरक्षणासाठी तत्पर राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 22:07 IST

विद्यार्थ्यांनी व्यसनाच्या आहारी जावू नये. विद्यार्थी हे देशाची शान आहे. देशाच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने तत्पर असले पाहिजे. त्यासाठी आतापासून मनाची तयारी ठेवा, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी येथे केले.

ठळक मुद्देविनिता साहू : संत शिवराम विद्यालयात स्नेहसंमेलनाला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विद्यार्थ्यांनी व्यसनाच्या आहारी जावू नये. विद्यार्थी हे देशाची शान आहे. देशाच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने तत्पर असले पाहिजे. त्यासाठी आतापासून मनाची तयारी ठेवा, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी येथे केले.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेद्वारा संचालित संत शिवराम महाराज विद्यालयाच्या स्नेहसंमेल उद्घाटन सोहळ्यात त्या गुरुवारी बोलत होत्या. त्यांच्याहस्ते स्रेहसंमेलन आणि विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष कैलास बशिने होते. प्रमुख पाहुणे म्हणून भंडारा पंचायत समितीच्या उपसभापती वर्षा साकुरे, वसतीगृहाच्या गृहपाल रजनी वैद्य, कास्ट्राईब संघटनेचे सुर्यभान हुमणे, संस्थेचे उपाध्यक्ष भाऊराव दुधकार, मुख्याध्यापक देवानंद चौधरी, मुख्याध्यापिका कुंदा गोडबोले उपस्थित होते. यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक विनिता साहू म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी स्वयंरक्षीत होण्याची गरज आहे. शालेय परिसरात कुणी आमिष देत असेल, कुणाला फुस लावत असेल तर लगेच आपल्या शिक्षकांना सांगा, कुठे गुन्हा घडत असेल तर किंवा तुम्हाला धोका वाटत असेल तर पोलीस विभागाने प्रतिसाद हा अ‍ॅप सुरु केला आहे. तो आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन घ्या. बटन दाबल्याच आपण कुठेही असले तरी लोकेशननुसार आपल्या मदतीला धावून येईल, असे त्यांनी सांगितले.यावेळी दहावीच्या परिक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या रुपाली सोनकुसरे, रेणुका ठक्कर, ऐश्वर्या नंदनवार, रितीक चोपकर यांच्यासह हॉकी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणारे उमेश बांते, मुकेश खरब आणि शिष्यवृत्ती परिक्षेतील तेजस कारेमोरे, क्षितीज मोहनकर, साहस मेश्राम, महंत लाडे यांचा सत्कार करण्यात आला. यशस्वीतेसाठी सुरेश गोंधळे, धिरज बांते, रजनी सेलोकर, अश्विनी देशभ्रतार, संजय पडोळे यांनी परिश्रम घेतले. संचालन शेखर बोरकर यांनी केले. 

टॅग्स :PoliceपोलिसSchoolशाळा