शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

धान उत्पादकांना बोनसचा लॉलिपॉप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 21:58 IST

आॅनलाईन लोकमतकोंढा (कोसरा) : नागपूर विधीमंडळ अधिवेशनात धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रूपये बोनस शासनाने जाहीर केले. अधिवेशन संपून दोन महिन्यांचा कालावधी लोटला. पण बोनस देण्याचे परिपत्रक शासकीय आधारभूत केंद्राला प्राप्त न झाल्याने शेतकरी संभ्रमात पडले आहेत. पणिामी धान उत्पादकांना बोनसचा फक्त लॉलीपाप दिला होता काय? असा प्रश्न शेतकरी ...

ठळक मुद्देशेतकरी संभ्रमात : ३१ मार्चपूर्वी वाटप होणार काय?

आॅनलाईन लोकमतकोंढा (कोसरा) : नागपूर विधीमंडळ अधिवेशनात धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रूपये बोनस शासनाने जाहीर केले. अधिवेशन संपून दोन महिन्यांचा कालावधी लोटला. पण बोनस देण्याचे परिपत्रक शासकीय आधारभूत केंद्राला प्राप्त न झाल्याने शेतकरी संभ्रमात पडले आहेत. पणिामी धान उत्पादकांना बोनसचा फक्त लॉलीपाप दिला होता काय? असा प्रश्न शेतकरी विचारित आहेत.जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक आहे. धा उत्पादक तथा चौरास पट्टा म्हणून पवनी व लाखांदूर तालुका ओळखला जातो. यावर्षी धानाची उतारी कधी नव्हे एवढी कमी आली आहे. उत्पादन खर्च एका एकरला जवळपास २० हजार रूपये आला आहे. त्यामानाने धानाचा उतारा एका एकरास १० ते १३ क्विंटल मिळाले. त्यामुळे शेतकरी हतबल आहे. बियाणे, खत, औषधी, मजुरी व कापणी, मळणी असे खर्च भरमसाठ वाढले होते.धानाची शेती परवडणारी नाही, असे चौरास भागातील शेतकरी ओरडत आहेत. बँक, सहकारी संस्था, खासगी पतसंस्था, खासगी सावकार यांच्याकडून अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढले ते उत्पादन अत्यल्प झाल्याने फेडू शकले नाही. ठोकळ प्रतीचे धान पेरणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने १,५५० रूपये भाव देऊन मोठी फसवणूक केली. सध्या तरी बारीकप्रतीचे धान व्यापारी २,५०० रूपये क्विंटल भावाने धान खरेदी करीत आहेत. मात्र १,५५० रूपये क्विंटल भावाने धानाची आधारभूत केंद्रावर शासनाने खरेदी केली.धानाच्या किंमतीत शेतकºयांना शासनाने मारल्यानंतर नागपूर विधीमंडळ अधिवेशनात प्रति क्विंटल ५०० रूपये बोनस देईल, अशी अपेक्षा बाळगून अनेक शेतकरी होते. पण ते देखिल प्रति क्विंटल २०० रूपये बोनस जाहीर करून घोर निराशा केली. नागपूर अधिवेशनात शासनाने बोनस जाहीर केला. पण त्यासंबंधी आदेश मात्र अद्याप काढले नाही. त्यामुळे आता सरकारच्या घोषणेबद्दल शेतकरी शंका व्यक्त करीत आहेत. मार्च अखेर सर्व शेतकरी बँक, सहकारी संस्था तसेच इतराचे कर्ज जमा करून नव्याने पीक कर्जाची उचल करीत असतात.३१ मार्चअखेर पीक कर्ज भरले तर सहकारी संस्था, बँक व्याज आकारणी करीत नाही. मात्र नंतर व्याज आकारणी करीत असतात. तेव्हा शासनाने जाहीर केलेले धानावरील बोनस ३१ मार्चपुर्वी शेतकºयांना दिल्यास त्याचा लाभ शेतकºयास होईल.बँक, सहकारी संस्थेचे त्याचा लाभ शेतकऱ्यास होईल. बँक, सहकारी संस्थेचे कर्ज भरण्यास मदत होईल, महाराष्ट्र शासनाने घोषित केलेले प्रति क्विंटल २०० रूपये बोनस त्वरीत शेतकऱ्यांना देण्याची मागणी जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.