शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाच लाख रुपयांची दारु पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 00:59 IST

मालवाहू वाहनातून दारुबंदी असलेल्या जिल्ह्यात दारुची तस्करी करित असताना जिल्हा रेड पथकाने रंगेहाथ पकडले ही कारवाई शनिवारी सायंकाळच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव शिवारात केली.

ठळक मुद्देजिल्हा रेड पथकाची कारवाई : दारुबंदीच्या गडचिरोलीत तस्करी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मालवाहू वाहनातून दारुबंदी असलेल्या जिल्ह्यात दारुची तस्करी करित असताना जिल्हा रेड पथकाने रंगेहाथ पकडले ही कारवाई शनिवारी सायंकाळच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव शिवारात केली. याप्रकरणी धरमु कुमार उदरुपाका रा. अर्जुनी मोरगाव याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पाच लक्ष वीस हजार रुपयांच्या दारुसह वाहन जप्त करण्यात आले.लाखांदूर तालुक्याला लागून असलेल्या वडसा येथे लाखांदूर मार्गे दारुची अवैध वाहतुक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. याच दरम्यान पेट्रोलिंगवर असलेल्या जिल्हा रेड पथकातील प्रमुख पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र आडोळे यांनी याबाबत सहकाऱ्यांना माहिती दिली. याशिवाय जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनात कारवाई केली.यात अर्जुनी मोरगाव येथून मालवाहक वाहन क्रमांक एम एच ३५ के ४१७८ मधून दारुची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. पथकाने लाखांदूर परिसरातील पिंपळगाव शिवारात सदर वाहन पकडले. यावेळी चालक उदरुपाका याने वाहनातून उडी घेवून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.यात त्याला दुखापतही झाली. पोलिसांनी वाहनातून खडर्््याच्या पेटीत देशी दारुने भरलेले १०० बॉटल व अन्य १०० अशा पाच लक्ष २० हजार रुपयांची दारु जप्त केली.तसेच चारचाकी वाहनही जप्त करण्यात आले. लाखांदूर पोलिसांनी अर्जुनी मोरगाव येथील दारु दुकान मालक कुमार विरय्या उदरुपाका व गाडीचालक याच्याविरुध्द महाराष्टÑ दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र आडोळे, सहा. फौजदार अश्विनकुमार मेहर, पोलीस हवालदार रुपचंद जांगळे, पोलीस नाईक प्रदिप डाहारे, विनोद शिवणकर, सचिन गाढवे यांनी केली आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस