शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

वीज कोसळून तरुण शेतकरी ठार; १५ महिला मजूर किरकोळ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2022 13:07 IST

जिल्ह्यात २४ तासांत जोरदार पाऊस झाला असून २५ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देमोहगावदेवीची घटना

राजू बांते

मोहाडी (भंडारा)  : शेतात रोवणी सुरू असताना अचानक वीज कोसळून तरूण शेतकरी ठार तर १५ महिला मजूर किरकोळ जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ८.१५ वाजता तालुक्यातील माेहगावदेवी येथे घडली. शुभम विजय लेंडे (२६) रा. मोहगावदेवी ता. मोहाडी असे मृताचे नाव आहे.

जिल्ह्यात २४ तासांत जोरदार पाऊस झाला असून २५ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. दमदार पावसाने शेतीच्या कामाला वेग आला आहे. रात्रीपासूनच परिसरात पावसाने थैमान घातले होते. बुधवारी सकाळी शुभम लेंडे यांच्या भात रोवणी सुरू होती. त्यावेळी विजाही कडाडत होत्या. शुभम पऱ्ह्याच्या पेंड्या शेतात टाकत होता. तर महिला रोवणी करीत होत्या. सकाळी ८.१५ वाजताच्या सुमारास बांधित अचानक वीज कोसळली. त्यात शुभम गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला. तर महिला मजूर जखमी झाल्यात.

सविता संजय तलमले (३७), अश्विनी आंबीलकर (२९), नीतू जितेंद्र वानखडे (३०), भुमेश्वरी संदीप साखरवाडे (२७), रविना विनोद लेंडे (१८), नंदा मोहन बाळबुधे (२८), जनाबाई दशरथ लेंडे (५०), नीला विनोद लेंडे (४०), कविता कैलास देशमुख (३५), वर्षा नरेंद्र लेंडे (२७), सुरेखा प्रमोद लेंडे (३४), पुस्तकला अमर लेंडे (६०), सुमन वामन लेंडे (६०), यमुना मूलचंद लेंडे (६५), सकू मनोहर लेंडे (५८) अशी जखमी महिलांची नावे आहेत.

घटनेची माहिती गावात होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शुभमला मोहाडी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याल मृत घोषित केले. जखमी मजुरांवर मोहाडीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेची माहिती महसूल विभागाला देण्यात आली. तलाठ्याने घटनास्थळाचा पंचनामा केला. तर या घटनेची तक्रार वरठी ठाण्यात देण्यात आली. शुभम हा अविवाहित असून त्याच्या मागे वडील, आई, आजोबा व एक भाऊ असा परिवार आहे. गुरूपौर्णिमेच्या दिवशी तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.  

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघातbhandara-acभंडारा