शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
3
Swiggy, Zomato आणि ओला-उबर महागणार? नवीन कायद्यामुळे ग्राहकांना सोसावा लागणार भुर्दंड!
4
Tata Sierra : २२ वर्षांनंतर 'लेजेंड इज बॅक'... Tata नं लाँच केली मोस्ट अवेटेड Sierra; कोणते मिळणार फीचर्स, किंमत किती?
5
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
6
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: मार्गशीर्षातले ४ गुरुवार 'अशी' करा स्वामी उपासना; दुप्पट लाभ होईल!
7
Sheikh Hasina: नऊ किलो सोनं, महागड्या आणि मौल्यवान वस्तू; शेख हसीना यांच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड!
8
'नॅशनल क्रश' गिरीजा ओकला येतायेत विचित्र मेसेज; म्हणाली, "मला रेट विचारला जात आहे..."
9
IND vs SA : टीम इंडियानं घरच्या मैदानात गुडघे टेकल्यावर नेटकऱ्यांना आठवला विराट; गंभीर होतोय ट्रोल
10
"प्रभू श्रीराम सगळ्यांचे... मी दलित म्हणून मला बोलवलं नाही"; अयोध्या खासदाराचा नाराजीचा सूर
11
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
12
Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण!
13
Apple नंतर ही कम्प्युटर बनवणारी 'ही' दिग्गज कंपनी ६००० कर्मचाऱ्यांची कपात करणार, का घेतला हा मोठा निर्णय?
14
१० वर्षांत १ कोटींचा टप्पा गाठायचा आहे? SIP द्वारे कोणत्या फंडात आणि किती गुंतवणूक करणे फायदेशीर!
15
महालक्ष्मी व्रतकथा: महालक्ष्मी व्रत कथेशिवाय पूजा अपूर्ण; पती-पत्नीने मिळून वाचल्यास मिळते अधिक फळ!
16
घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणानंतर सेलिना जेटलीची पहिली पोस्ट; म्हणाली, "माझी मुलं..."
17
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
18
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
19
मार्गशीर्षातला पहिला गुरुवार, महालक्ष्मी व्रताची तयारी झाली का? वाचा साहित्य आणि पूजाविधी
20
गरिबांसाठीच्या योजनांवर १ लाख कोटी रुपयांचा खर्च; लोककल्याणाचा उदात्त हेतू, पण सरकारी तिजोरीवर वाढता ताण
Daily Top 2Weekly Top 5

एकाला आजीवन तर दुसऱ्या आरोपीला सात वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 22:22 IST

एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून दोन आरोपींनी लोखंडी हातोडीने अश्विनी शिंदे या तरूणीवर जीवघेणा हल्ला केला होता. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश संजय देशमुख यांनी मुख्य आरोपीला आजीवन तर दुसºया आरोपीला सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा शुक्रवारला सुनावली. याच आरोपींविरूद्व प्रीती बारिया या महिलेचा खून प्रकरणी दोष सिद्ध झाले असून या प्रकरणाची अंतिम सुनावणी शनिवारला सकाळी ११.३० वाजता होणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय : अश्विनी शिंदे हल्लाप्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून दोन आरोपींनी लोखंडी हातोडीने अश्विनी शिंदे या तरूणीवर जीवघेणा हल्ला केला होता. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश संजय देशमुख यांनी मुख्य आरोपीला आजीवन तर दुसºया आरोपीला सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा शुक्रवारला सुनावली. याच आरोपींविरूद्व प्रीती बारिया या महिलेचा खून प्रकरणी दोष सिद्ध झाले असून या प्रकरणाची अंतिम सुनावणी शनिवारला सकाळी ११.३० वाजता होणार आहे.अमिर एजाज शेख या आरोपीला भादंवि ३०७ कलमान्वये आजन्म कारावास तर सचिन कुंडलीक राऊत या आरोपीला भादंवि ३९७ कलमान्वये सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.३० जुलै २०१५ रोजी दुपारच्या सुमारास म्हाडा कॉलनीतील रविंद्र शिंदे यांच्या घरी मुलगी अश्विनी एकटी असल्याचे पाहून एसी दुरूस्तीच्या बहाण्याने अमिर एजाज शेख व सचिन कुंडलीक राऊत या दोन तरूणांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर तिच्या डोक्यावर लोखंडी हातोडीने वार केले होते. तेव्हापासून अश्विनीला कायम अपंगत्व आले आहे.त्याच रात्री ८ वाजताच्या सुमारास या आरोपीनी तकीया वॉर्डातील रूपेश बारीया यांच्या घरी एसी दुरूस्तीच्या बहान्याने प्रवेश करून प्रिती बारीया (३०) यांच्या डोक्यावर हातोडीने वार करून जिवानीशी ठार केले. दरम्यान, तिचा मुलगा भव्य बारीया (९) हा समोर आला असता आरोपींनी त्याच्याही डोक्यावर हातोडीने वार केल्यामुळे त्यालाही अपंगत्व आले आहे.याप्रकरणी भंडारा पोलिसांनी अटक करून आरोपींविरूद्ध भादंवि ३०२, ३०७, ३९७, ४५२ कलमान्वये गुन्हे नोंदविले होते. तपासात पोलिसांनी दागिने, रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली हातोडी आरोपीच्या घरून जप्त केली होती. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणाची अंतिम सुनावणी शुक्रवारला झाली. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी अश्विनी शिंदे प्रकरणात आजन्म कारावासाची शिक्षा तर प्रीती बारिया खून प्रकरणात दोष सिद्ध झाले असून या प्रकरणाची सुनावणी शनिवारला करण्यात येणार आहे. शनिवारच्या अंतिम निकालाकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.प्रीती बारिया खून प्रकरणाची सुनावणी आजप्रीती बारिया या बहुचर्चित खून खटल्यात आरोपींविरूद्ध आज शुक्रवारला झालेल्या युक्तीवादात दोष सिद्ध झाले. आता या खटल्याची अंतिम सुनावणी शनिवारला सकाळी जिल्हा व सत्र न्यायालयात होणार आहे. अमिर शेख आणि सचिन राऊत या आरोपींनी प्रीती बारिया यांचा खून केला होता. त्यापूर्वी अर्जुनी (मोरगाव) येथील नितू सुरेश पशिने या महिलेचा याच आरोपींनी खून केला होता. या जीवघेणा हल्ल्यात अश्विनी शिंदे व भव्य बारिया या मुलाला कायमचे अपंगत्व आले आहे. त्यामुळे अश्विनी व भव्यला आयुष्यभर या असह्य वेदना सहन कराव्या लागणार आहेत. या दोघांच्या उपचारासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी लाखो रूपये खर्च करूनही हे दोघे आजवर सामान्य स्थितीत आली नाहीत. त्यामुळे या क्रूर आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा होत आहे, अशी मागणी होत आहे.