शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 06:00 IST

जिल्ह्यात शहरीच नव्हे तर आता ग्रामीण भागातही इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु झाल्या आहेत. विद्यार्थी मिळावे म्हणून शाळा व्यवस्थापन पालकांना विविध आमिष देत असतात. त्यात घरापासून शाळेपर्यंत स्कूल बसची सुविधा असल्याचे सांगितले जाते. भरमसाठ फी भरुन विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी पालक आपल्या चिमुकल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेतात.

ठळक मुद्देअपघाताने वास्तव उघड : गावखेड्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळा

निश्चित मेश्राम।लोकमत न्यूज नेटवर्कपालोरा : ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरु आहे. अप्रशिक्षित चालक आणि असुरक्षित वाहनातून शेकडो चिमुकले प्रवास करतात. पवनी तालुक्यातील सेंद्री खुर्द येथे झालेल्या स्कूलबसच्या अपघातानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.जिल्ह्यात शहरीच नव्हे तर आता ग्रामीण भागातही इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु झाल्या आहेत. विद्यार्थी मिळावे म्हणून शाळा व्यवस्थापन पालकांना विविध आमिष देत असतात. त्यात घरापासून शाळेपर्यंत स्कूल बसची सुविधा असल्याचे सांगितले जाते. भरमसाठ फी भरुन विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी पालक आपल्या चिमुकल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेतात. घरापासून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरील शाळांमध्ये विद्यार्थी पाठविले जातात. बहुतांश शाळांच्या स्कूल बस असल्यातरी त्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. परिवहन विभागाचे स्कूल बस संदर्भात अत्यंत कडक नियम आहेत. मात्र ग्रामीण भागातील इंग्रजी माध्यमाच्या शाळा या सुरक्षेकडे दुर्लक्ष करतात. अनेक शाळांनी तर स्कूल बस ऐवजी छोट्या वाहनातून विद्यार्थ्यांना असुरक्षितपणे ने-आण केली जाते. या वाहनावरील चालकांच्या कौशल्यशैलीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होते. अनेक वाहनांवरील चालकतर अप्रशिक्षित असतात. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी कोंबून नेतात. विद्यार्थ्यांना बसायला जागाही नसते. पवनी तालुक्यातील सेंद्री खुर्द येथे स्कूल बस उलटून ३५ विद्यार्थी जखमी झाले. सुदैवाने प्राणहाणी झाली नाही. मात्र या अपघाताने स्कूल बसच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.पाल्याच्या भविष्यासाठी पालक पदरमोड करुन इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मुलांना पाठवितात. शाळेची भरमसाठ फी भरल्यानंतर प्रवासासाठी स्कूल बसचे वेगळे पैसेही भरतात. परंतू आपल्या मुलाच्या सुरक्षेबाबत कोणताही पालक जागृ्रक असल्याचे दिसत नाही. स्कूल बस असल्याने पोलीसही अशा वाहनावर क्वचितच कारवाई करतात. मुलांच्या वाहनावर कशाला कारवाई म्हणून पोलीस नरमाईची भूमिका घेतात. यामुळेच अशा स्कूल बसचे चांगलेच फावते.स्कूल बससोबतच अनेक विद्यार्थी एसटी महामंडळाने प्रवास करतात. सवलतीचा पास काढून ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरात येतात. परंतू त्यांना दररोज बसमध्ये उभ्यानेच प्रवास करावा लागतो. अनेकदा रात्री उशिरापर्यंत बस मिळत नसल्याने थांब्यावरच थांबून राहावे लागते. विद्यार्थीनींचा सुरक्षेचा प्रश्न यामुळे निर्माण होतो.मानवविकास मिशनच्या बसेस असल्या तरी त्याचा उपयोग प्रवाशांसाठीच केला जातो. यामुळे विद्यार्थी दुर्लक्षीतच राहतात. जिल्ह्यातील सर्व स्कूल बसचे आॅडीट करुन सुरक्षेची खातरजमा करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.विद्यार्थीनींची मोफत पास बंदपहिली ते बारावीपर्यंत बाहेरगावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना अहिल्याबाई होळकर योजनेमार्फत मोफत एसटी बस पास दिली जात होती. त्यामुळे अनेक मुली बाहेरगावी जावून शिक्षण घेत होत्या. परंतु गत वर्षभरापासून ही पास बंद करण्यात आली. त्यामुळे अनेक मुली उच्च शिक्षणापासून वंचित आहे. पालकांनी मुलींना शहरी भागात पाठविणे बंद केले आहे. ही योजना सुरु करावी अशी मागणी या निमित्ताने पुन्हा एकदा पुढे आली आहे.परिवहन विभागाचे दुर्लक्षस्कूल बस संदर्भात परिवहन विभागाचे कडक नियम आहेत. या नियमांच्या अधिनराहूनच विद्यार्थ्यांची वाहतूक करावी लागते. परंतू ग्रामीण भागातील स्कूल बस सर्व नियम पायदळी तुडवत प्रवास करतांना दिसतात. स्कूल बससोबत शालेय विद्यार्थी वाहतूकीचा परवाना नसलेले वाहनेही विद्यार्थ्यांची ने-आण करतांना दिसतात. आॅटोरिक्षांमध्ये तर विद्यार्थी अक्षरश: कोंबून असतात.आपल्या मुलाला कुठे शिकवावे. हा प्रत्येक पालकाचा अधिकार आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडेही पालकाने लक्ष देण्याची गरज आहे. शाळा व्यवस्थापनाने केवळ पैसे कमविण्याच्या नादात चिमुकल्याचे भविष्य हिरावून घेवू नये. स्कूल बसची तपासणी करावी.- बाळू फुलबांधेशिवसेना विधानसभा प्रमुखविद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेरकोंढा-कोसरा : सेंद्री खुर्द गावाजवळ झालेल्या स्कूल बस अपघातातील गंभीर जखमी विद्यार्थी आणि कर्मचारी यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकिय सुत्रांनी सांगितले. भंडारा येथील खाजगी रुग्णालयात या विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहे. कोंढा येथील मदर टेरेसा पब्लिक स्कूलच्या बसला अपघात होऊन ३५ विद्यार्थी व चार कर्मचारी जखमी झाले होते. गंभीर जखमी मानसी चिलमकर (४) हिच्या डोक्याला दुखापत झाली आहे. तर मयुरी उपरिकर (९) ही या अपघातात गंभीर जखमी झाली होती. या दोघांवर भंडारातील रुग्णालयात उपचार सुरु आहे. कर्मचारी सुषमा नंदागवळी, संध्या गिरडकर यांच्यावरही उपचार सुरु आहे. दरम्यान या प्रकरणी अड्याळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक चौकशी पोलीस निरीक्षक सुरेश ढोबळे यांच्या मार्गदर्शक जमादार सुभाष मस्के करीत आहे.

टॅग्स :Accidentअपघात