शहरं
Join us  
Trending Stories
1
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
2
“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
3
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
4
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
5
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
6
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
7
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
8
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
9
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
10
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
11
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
12
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
13
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
14
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
15
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
16
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
17
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
18
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
19
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
20
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे

राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2021 5:00 AM

नाकाडोंगरी राज्य मार्गावरील जड वाहतूक तुमसर-बपेरा राष्ट्रीय महामार्गावर वळते करण्यात आली आहे. यामुळे वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. जड वाहतूक वळविण्यात आली असली, तरी मार्गाची अवस्था खड्ड्यात गेली आहे. राज्यमार्ग असणाऱ्या तुमसर-बपेरा मार्गाला राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आल्यानंतर चौपदरीकरणच्या कामांना सुरुवात करण्यात आली नाही. आधी राज्यमार्ग घोषित असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा मार्गाचे नूतनीकरण करीत असे, परंतु तसे चित्र आजघडीला नाहीत.

लाेकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आलेल्या तुमसर-बपेरा मार्गावरील वाढत्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मणक्यांचा त्रास वाढला असून अपघातात वाढ झाली आहे. महामार्ग बांधकामाला विलंब होत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. जलद गतीने कामे सुरू करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते एकवटले आहेत. नाकाडोंगरी राज्य मार्गावरील जड वाहतूक तुमसर-बपेरा राष्ट्रीय महामार्गावर वळते करण्यात आली आहे. यामुळे वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. जड वाहतूक वळविण्यात आली असली, तरी मार्गाची अवस्था खड्ड्यात गेली आहे. राज्यमार्ग असणाऱ्या तुमसर-बपेरा मार्गाला राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आल्यानंतर चौपदरीकरणच्या कामांना सुरुवात करण्यात आली नाही. आधी राज्यमार्ग घोषित असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा मार्गाचे नूतनीकरण करीत असे, परंतु तसे चित्र आजघडीला नाहीत. खड्डे बुजविण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभाग करीत असल्याने वाहनधारकांना त्रास जाणवत नव्हता. यानंतर राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आल्यानंतर मार्गाची दुरुस्ती अडली आहे. महामार्ग खड्ड्यात गेल्याने वाहनधारकांना कमरेचे त्रास वाढले आहेत. मणक्याच्या आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत. सिहोरा परिसरातून गेलेल्या या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था वाईट झाली आहे. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग अरुंद असल्याने दुहेरी वाहने चालविताना जिकिरीचे ठरत आहे. अपघाताची शृंखला सुरू झाली आहे. सिहोरा ते चुल्हाड गावापर्यंत वाहने रस्त्यावर आदळत आहे. मार्ग दुहेरी भागात वगळण्यात आल्याने दुचाकीस्वारांचे अपघात वाढले आहे, परंतु चौपदरीकरणाच्या कामांना सुरुवात करण्यात आली नाही. दरम्यान, नाकाडोंगरी मार्गावरील बावनथडी नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत चौपदरीकरणच्या कामांना सुरुवात होणार नाही, अशी माहिती मिळाली आहे. लगेच या मार्गाचे चौपदरीकरणाच्या कामांना सुरुवात केल्यास मार्ग बांधकामावरून समस्या व अडचण निर्माण होऊ शकतो, असा कयास लावले जात आहे. भंडारा ते बालाघाट असे नावारूपास आलेल्या या चौपदरीकरण मार्गाचे बांधकामात तुमसरचा बायपास मार्ग अडचणीचे ठरत आहे. या मार्गाचे आधी बांधकाम पूर्ण करणे गरजेचे होणार आहे. बिनाखी ते बपेरापर्यंत या राष्ट्रीय मार्गावरून पायदळ चालता येत नाही. महामार्गावर खिंडारी पडल्या आहेत. या महामार्गाचे दोन्ही कडेला झुडपे वाढले आहेत. झुडपाची स्वच्छता करण्यात येत नाही. यामुळे विकास मंदावला आहे. महामार्गाचे तत्काळ चौपदरीकरणची कामे सुरू करण्याची मागणी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवेंद्र मेश्राम, संतोष बघेले, सरपंच पारस भुसारी, सरपंच अनिता बघेले, सरपंच वैशाली पटले, सरपंच ममता राऊत, सरपंच कंचन कटरे, सरपंच सुषमा पारधी, सरपंच पमु भगत, सरपंच राजेश बारमाटे, सरपंच नितीन गणवीर,  आशा लांजे, विमल काणतोडे, सरपंच चंदा ठाकरे, भाजयुमोचे उपाध्यक्ष विनोद पटले, माजी उपसरपंच कंठीलाल ठाकरे, देवानंद लांजे, हेमराज लांजे, धनराज भगत, खुमान शरणागत, गुड्डू श्यामकुवर यांनी केली आहे. 

माडगी ते बपेरा रस्त्याचे नूतनीकरण करा-  वैनगंगा नदीच्या काठालगत असणाऱ्या गावांना जोडण्यासाठी माडगी ते बपेरा असे रस्ते विकास कृती आराखड्यात नोंद करण्यात आली आहे. २८ किमी अंतरपर्यंत लांब असणाऱ्या या मार्गाचे दुरुस्तीचे कार्य राज्य अखत्यारीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहे. या मार्गावर ग्रामीण गावे आहेत. रस्त्याचे चित्र भकास झाले आहे. खड्डे पडले आहेत. या मार्गावर चुल्हाड जिल्हा परिषद क्षेत्रातील बहुतांश गावे आहेत. रस्ता नादुरुस्त असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पूरग्रस्त गावांना न्याय देण्यासाठी आमदार राजू कारेमोरे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष उमेश कटरे यांनी दिली आहे. निधी खेचून आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक