शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जीवनदायीनी वैनगंगा दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 00:44 IST

जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या वैनगंगा नदीचे पाणी नागनदीच्या सांडपाणी व जलजन्य वनस्पतींमुळे दिवसेंदिवस दूषित होत आहे. त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. आता नदीच्या स्वच्छतेसाठी कोण पुढाकार घेणार असा सवाल उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देआरोग्याला धोका : नदी स्वच्छतेसाठी कोण घेणार पुढाकार?

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या वैनगंगा नदीचे पाणी नागनदीच्या सांडपाणी व जलजन्य वनस्पतींमुळे दिवसेंदिवस दूषित होत आहे. त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. आता नदीच्या स्वच्छतेसाठी कोण पुढाकार घेणार असा सवाल उपस्थित होत आहे.वैनगंगा नदीच्या काठावर गोसेखुर्द सिंचन प्रकल्प बनविण्यात आला आहे. दूषित पाण्यामुळे आतपर्यंत शुद्ध असलेल्या पाण्याने रंग बदलला आहे. याचा परिणाम भंडारावासियांना जाणवू लागला आहे.आरोग्य आणि पाणी पुरवठा विभागाने यासंबंधी राज्य सरकारला पाठविलेल्या अहवालात नागपूरच्या नाग नदीचे दूषित पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात येत असल्यामुळे पाणी दूषित झाल्याचे म्हटले आहे. तरीसुद्धा राज्य सरकारने ही समस्या गंभीरतेने घेतलेली नाही. नाग नदीसोबतच भंडारा शहरातील सांडपाणीसुद्धा वैनगंगा नदीला येऊन मिळत आहे. गोसेखुर्दमध्ये वैनगंगेचा प्रवाह थांबला आहे.परिणामी दूषित पाणी वाहून जात नाही. परिणामी या दूषित पाण्याच्या उपयोगामुळे नागरिकांना चर्म विकार जडले आहेत.याशिवाय पोटाचे विकार फुफ्फुस आणि श्वसनाचे आजार बळावत आहेत. याला मुख्य कारण वैनगंगा नदीचे दूषित पाणी असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे ईकॉर्नियाची समस्येमुळे त्यात अधिक भर पडली आहे.भंडारा, पवनी तालुक्यातील गावे प्रभवैनगंगा नदीच्या दूषित पाण्यामुळे प्रभावित झालेल्या नदी काठावरील गावांची निवड शुद्ध पाणीपुरवठ्याकरीता करण्यात आली आहे.भंडारा व पवनी तालुक्यातील या गावांमधील पाण्याचे नमुने फार पूर्वी तपासणीसाठी पाठविण्यातही आले होते. त्यात नदीचे पाणी दूषित असल्यामुळे ते पिण्यायोग्य नसल्याचे सांगून जलशुद्धीकरणानंतर पाण्याचा पुरवठा केला पाहिजे, असेही अहवालात नमूद आहे.मत्स्योत्पादनही घटलेवैनगंगेचा प्रवाह थांबल्यामुळे त्याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. नदीचे दूषित पाणी केवळ मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरत असतानाच जलचर प्राण्यांसाठी घातक ठरत आहे. वैनगंगा नदीतील मासोळ्याची दूरवर मागणी होती. परंतु नदीचे पाणी दूषित झाल्यामुळे मासे मृत्यूमुखी पडत आहेत. माशांची प्रजननक्षमता घटल्यामुळे त्याचा परिणाम मत्स्योत्पादनावर झाला असल्याचे दिसून येते.

टॅग्स :riverनदी