शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

चर्मोउद्योगाच्या बाजारपेठेसाठी लिडकॉमचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2023 15:32 IST

युवकांचे जीवनमान उंचावणार; लिडकॉम-संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळाचा उपक्रम 

देवानंद नंदेश्वर

भंडारा ः चर्मोद्योगाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये स्थान मिळावे म्हणून संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहे. याकरिता कृती आराखडा तयार करण्यात आला असून  लेदर एक्स्पोर्ट कॉन्सिलसोबत करार करून उभारी देण्याचे प्रयत्न सुरू आहे. येणाऱ्या काळात चर्मकार समाजातील युवकांना विकासाच्या प्रवाहात हक्काचे स्थान मिळेल, असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे.

अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील युवकांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ आणि लिडकॉम यांच्या संयुक्त विद्यमाने कृती आराखडा तयार करण्यात आला. लेदर एक्स्पोर्ट कॉन्सिलसोबत करार करून चर्मोद्योगाला उभारी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. याकरिता लिडकॉम आणि महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांच्या पुढाकारातून हे प्रयत्न सुरू असून आराखडा तयार करण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अनेक योजना आहेत. चर्मकार समाजातील प्रत्येक घटकाला न्याय आणि विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी चर्मकार आर्थिक विकास महामंडळ कार्यरत आहे. गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या महामंडळाने समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. व्यस्थापकीय संचालकपदावर धम्मज्योती गजभिये रुजू झाल्यानंतर अनेक बदल केले. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, याकरिता योजनांना गती प्राप्त करून दिली आहे. 

चर्मकार कामगार, त्यातही चौकात उकाड्यात छत्रीखाली पादत्राणे शिवणाऱ्या गटई कामगार बांधवांचे दैनंदिन प्रश्‍न सुटावेत, त्यांचे जगणे सुधारावे, त्यांना स्वकष्टाने, स्वाभिमानाने जगता यावे. या समाजातील पुढच्या पिढीचे भविष्यही स्वावलंबी आणि उज्ज्वल व्हावे या हेतूपूर्तीसाठीच संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. याला आता लिडकॉमची जोड मिळाली आहे. मंडळांतर्गत स्थानिक पातळीवर ५० टक्के अनुदान योजना, बीज भांडवल योजना प्रशिक्षण,गटई स्टॉल योजना राष्ट्रीयकृत बॅंकेमार्फत राबविण्यात येतात. याशिवाय होतकरू विद्यार्थ्यांना देश-परदेशातील शिक्षणासाठी तसेच स्वयंरोजगारासाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास मंडळातर्फे आर्थिक मदतीच्या योजना राबवण्यासाठी नुकताच आराखडा तयार करण्यात आला आहे. लिडकॉमच्या माध्यमातून आगामी काळात राज्यात २५ हजार चर्मकार युवकांना चर्मोद्योगाचे प्रशिक्षण देण्यात येईल. हा उद्योग वाढवण्यासाठी पोलिस विभागास चामड्याच्या वस्तूंचा पुरवठा करण्याबाबतचा नवीन प्रस्तावही तयार करण्यात आला. महामंडळातील कर्मचारी भरतीपासून तर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यात येतील. कृती आराखडा २५००० उद्योजक घडविण्याचा प्रयत्न महामंडळांतर्गत ई-ऑफिस प्रणाली सुरू करण्यात येईल भाग भांडवल एक हजार कोटीपर्यंत वाढविण्याचा प्रयत्न. महामंडळाची वेबसाइट नव्याने तयार करण्यात येईल. नव्याने ई-कॉमर्स पोर्टल तयार करण्यात येईल. विभागीय स्तरावर चर्मवस्तू प्रदर्शनाची योजना -नवी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न 

चर्मकार समाजातील मुला-मुलींना शिक्षण-प्रशिक्षणातून उद्योजक तयार करण्यापर्यंतचा आराखडा तयार करण्यात आला आहे. चर्मकार कारागिरांना प्रोत्साहित करून विविध क्लस्टरची निर्मिती करण्यात येईल. त्या माध्यमातून स्थानिक पातळीवर चर्मोद्योगाला प्रोत्साहन मिळेल.राज्यातील चर्मकार समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचा सरकारचा आणि महामंडळाचा उद्देश आहे. -धम्मज्योती गजभिये, व्यवस्थापकीय संचालक , लिडकॉम, महाराष्ट्र.