शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

लग्नकार्यात 'होऊ द्या खर्चाची' मानसिकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 23:12 IST

सध्या लग्नसराई सुरू असून जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी लॉन्स आणि मंगल कार्यालये हाऊसफुल्ल असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. प्रतिष्ठा जपण्याच्या हव्यासापायी होऊ द्या खर्च, अशी मानसिकता ग्रामीण भागात होऊ लागली आहे. मोकळ्या वावरात किंवा घराच्या समोर भलामोठा मांडव टाकून लग्न उरकण्याची प्रथा आता मागे पडली आहे.

ठळक मुद्देअन्नाची नासाडी : ग्रामीण भागातही येतोय शहरी ट्रेंड

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सध्या लग्नसराई सुरू असून जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी लॉन्स आणि मंगल कार्यालये हाऊसफुल्ल असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. प्रतिष्ठा जपण्याच्या हव्यासापायी होऊ द्या खर्च, अशी मानसिकता ग्रामीण भागात होऊ लागली आहे. मोकळ्या वावरात किंवा घराच्या समोर भलामोठा मांडव टाकून लग्न उरकण्याची प्रथा आता मागे पडली आहे. मांडवांची जागा लॉन्स आणि मंगल कार्यालयांनी घेतली आहे. मात्र सर्वसामान्यांची लग्न अजूनही मांडवातच होतात. जेवणासाठी पंगतीबरोबरच काही ठिकाणी बुफे पद्धत अवलंबली जावू लागल्यामुळे अन्नाची नासाडी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. अन्न हे पूर्णब्रम्ह आहे. या उन्नतीचा बहुतांश नागरिकांना विसर पडत आहे. परिणामी अन्नाच्या नासाडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.उन्हाची तमा न बाळगता बँडपथकाच्या तालावर बेधुंद नाचणाऱ्या तरूणाईला आळा घालून लग्न वेळेवर लावावे, व अन्नाची नासाडी बंद करावी याकरिता वधूपक्षाकडील मंडळी वरपक्षाची मनधरणी करत असल्याचे चित्र दिसत आहे.बदलत्या वातवरणामुळे वºहाडी मंडळीची धावपळ आधुनिक युगात लग्नसोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. हुंडापद्धत बंद झाली असली तरी संसारोपयोगी वस्तू दागिने, महागड्या साड्या, पंचपक्वानाची पंगत आदी सगळे वधूपित्यास हायटेक पद्धतीने करावे लागते.आजच्या आधुनिक युगामध्ये सर्वच बाबतीत चंगळवाद वाढत असून, लग्नसोहळे याला अपवाद राहिलेले नाहीत. ग्रामीण भागात लग्नसोहळ्यातील बुंदी, वरण भात अन उसळ हे पारंपारिक पदार्थ मागे पडले असून अलीकडे गोड खाद्यपदार्थादेखील एकापेक्षा अधिक निवडले जाऊ लागले आहेत. तसेच साधा भात अन् वरण याबरोबरच मसाला भाताचाही समावेश होऊ लागला आहे.ग्रामीण भागांमध्ये एकाचेवळी चार चार लग्न होत असल्याने विवाहांना हजेरी लावणारी मंडळी जेवण करणे टाळू लागली आहे. परिणामी वधू-पित्याने पाहुण्यांसाठी तयार केलेल्या अन्नाची नासाडी होते. लग्नामध्ये मोठ्या प्रमाणात वºहाडीमंडळी येतील, अशा अपेक्षेने वधू-पक्ष जेवण तयार करतो, परंतु एकाच दिवशी आठ ते दहा लग्नपत्रिका आलेल्या असतात. पावसाने मोठ्या प्रमाणात कहरच केला आहे.ढगाळ वातावरण सकाळी ८ वाजेपासून जाणवणारा उकाडा. उष्णतेमुळे स्वयंपाक वाया जाईल, म्हणून आता मोठ्या प्रमाणात लग्नाआधीच जेवणाचा कार्यक्रम सुरू केला जातो. जेवणाचा मेनुसुद्धा बदलणे आवश्यक आहे. आता सध्या सर्वत्र वरण भात मसाले भात, पुरी भाजी, जिलेबी, बुंदी लाडू, गुलाबजामू पदार्थ लग्न सोहळ्यामध्ये दिसतात. स्वयंपाकाचा अंदाज येत नाही. त्यामुळे अन्नाची मोठ्या प्रमाणात नासाडी होताना दिसून येते.गरजेपेक्षा अधिक घेतले जाते अन्नशहरी भागात लग्नसोहळ्यांपासून पंगत पद्धत हद्दपार झाली असून बहुतांश समारंभात बुफे पद्धतीला पसंती दिली जात आहे. मात्र बुफे पद्धत ही अन्न नासाडीला सर्वाधिक कारणीभूत ठरत आहे. यामुळे जेवण ताटात वाढून घेण्यासाठी रांग लावावी लागते. परिणामी नागरिकांदेखील वारंवार रांगेत उभे राहण्याचा कंटाळा येतो. त्यामुळे एकदाच खाद्यपदार्थ गरजेपेक्षा अधिक प्रमाणात ताटामध्ये वाढून घेत जेवढे खाल्ले गेले तेवढे खायचे उरलेले ताटात तसेच सोडून देण्याचा प्रकार सर्रासपणे दिसून येतो. अनेकदा या पद्धतीत जेवण वाढून घेण्याचा नागरिकांचा पूर्व अंदाजही मोडकळीस येतो. ग्रामीण भागातील वºहाड असेल, तर बुफे पद्धत अन्नाचा कर्दनकाळच ठरते. सुशिक्षित वºहाडी असले तर काही प्रमाणात बुफे पद्धतीत अन्नाची नासाडी कमी होण्यास मदत होते.