शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

‘ते’ सिंचन प्रकल्प यावर्षी पूर्ण करू

By admin | Updated: May 27, 2016 00:50 IST

भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील ९० टक्के काम पूर्ण झालेल्या सिंचन प्रकल्पाचे उर्वरित काम गतीने करुन असे प्रकल्प यावर्षी पूर्ण करण्यात येतील.

जलसंपदा मंत्र्यांची ग्वाही : प्रकल्पाच्या देखभाल दुरूस्तीसाठी ४०० कोटी मिळणारभंडारा : भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील ९० टक्के काम पूर्ण झालेल्या सिंचन प्रकल्पाचे उर्वरित काम गतीने करुन असे प्रकल्प यावर्षी पूर्ण करण्यात येतील. यासाठी वनजमीन, भूसंपादन आणि निधीची अडचण तात्काळ मार्गी लावू, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघुसिंचन प्रकल्पाचा आढावा गुरूवारला जिल्हा परिषद सभागृहात घेण्यात आला. यावेळी ना. महाजन बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, आमदार चरण वाघमारे, आमदार विजय राहांगडाले, आमदार संजय पुराम, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय.एस.चहल, गोसेखुर्द प्रकल्प मुख्य अभियंता अविनाश सुर्वे, जिल्हाधिकारी धीरजकुमार, गोंदियाचे जिल्हाधिकारी विजय सुर्यवंशी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर उपस्थित होते.गोसेखुर्द प्रकल्पाचे काम जलदगतीने पूर्ण करायचे आहे. प्रत्येक अधिकाऱ्यांकडे या प्रकल्पाची टप्पानिहाय अद्ययावत माहिती असली पाहिजे. त्याचबरोबर भूसंपादन किती, खातेदार किती, निधी खर्च, प्रकल्पातील अडचणी इत्यादी अद्ययावत माहिती सर्व आमदारांना देण्यात यावी, अशा सूचना प्रधान सचिव चहल यांनी केली. ९० टक्के काम पूर्ण झालेल्या ज्या प्रकल्पासाठी निधीची गरज आहे त्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करावा, अशी सूचनाही ना.महाजन यांनी केली.सिंचन प्रकल्पांच्या देखभाल दुरूस्तीसाठी शासन लवकरच ४०० कोटी रूपये उपलब्ध करुन देणार आहे. या निधीतून प्रकल्पांची देखभाल दुरुस्तींची कामे पूर्ण होवून प्रकल्प पूर्ववत कार्यान्वित होतील, अशी माहिती महाजन यांनी दिली.भिवरटोला कालव्याचे काम रेल्वेलाईनमुळे अडले आहे. रेल्वेलाईनच्या खालून पाईपलाईन टाकण्याचा प्रस्ताव असून रेल्वेची मंजुरी मिळताच हे काम सुरू होईल, असे सुर्वे यांनी सांगितले. या बैठकीला जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)बावनथडीसाठी भूसंपादन डिसेंबरपर्यंत बावनथडी प्रकल्पाचे कालव्यासाठी भूसंपादनाच्या रजिस्ट्रीचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. हा प्रकल्प सर्वार्थाने मार्च २०१७ पर्यंत पूर्ण करू, यासाठी शासनाने २०० कोटी रूपये दिले आहेत, असे सुर्वे यांनी सांगितले. गोंदिया जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाचा आढावा घेताना आमदार विजय राहांगडाले यांनी धापेवाडा सिंचन प्रकल्पाबाबत सदयस्थिती विचारली. धापेवाडा सिंचन प्रकल्पाचे अंदाजपत्रक एका आठवडयात सादर करू, तसेच बोदलकसा रायझिंग मेनच्या कामाचे अंदाजपत्रकही एक आठवडयात तयार करुन देऊ, याबाबत कालव्यांच्या ऐवजी बंद पाईपलाईन मधून पाणी देण्याचे शासनाचे धोरण चांगले आहे. यामध्ये भूसंपादन न करता कामे करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे सुर्वे यांनी सांगितले.पाणीपट्टी भरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रेरित कराटेकेपार आणि सोंडयाटोला उपसा सिंचन प्रकल्पाचे विद्युत बिलासाठी काही अनुदान शासनाने द्यावे अशी मागणी आमदार चरण वाघमारे यांनी केली. मात्र प्रत्येक बाबीसाठी शासन पैसे देऊ शकणार नाही. एका प्रकल्पाला सूट दिली तर सर्वच प्रकल्पासाठी अशी मागणी येईल आणि शासनाला हे परवडणारे राहणार नाही, अशी भूमिका ना. महाजन यांनी मांडली. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी पट्टी भरावीच लागेल. आमदारांनी पाणीपट्टी भरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रेरीत करावे तसेच याबाबत जनजागृती करावी असे आवाहन महाजन यांनी यावेळी केले.