शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

गावात भोंगे लावून चिमुकल्यांना गिरवतो धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 05:01 IST

देशाचे अतोनात आर्थिक नुकसान तर झाले आहेच सोबतच शिक्षणाचा ही बट्ट्याबोळ झाला आहे. त्यातल्या त्यात ऑनलाइन शिक्षण गावकऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे खेडेगावातील मुले शिक्षणाअभावी भरकटल्या जाऊ नये, म्हणून फिजीकल डिस्टनसिंगचे पालनही व्हावे, यासाठी दावेझरी येथील जय मोरे नावाचा उच्चशिक्षित तरुण गावात पोंगे लावून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवीत आहे.

दावेझरी येथील तरुणाचा उपक्रम : ऑनलाईन शिक्षणापेक्षा ऑफलाइन शिक्षण परवडणारेलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सध्या संपूर्ण जगात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे संपूर्ण जगातील कामकाज ठप्प झाले आहे. देशाचे अतोनात आर्थिक नुकसान तर झाले आहेच सोबतच शिक्षणाचा ही बट्ट्याबोळ झाला आहे. त्यातल्या त्यात ऑनलाइन शिक्षण गावकऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे खेडेगावातील मुले शिक्षणाअभावी भरकटल्या जाऊ नये, म्हणून फिजीकल डिस्टनसिंगचे पालनही व्हावे, यासाठी दावेझरी येथील जय मोरे नावाचा उच्चशिक्षित तरुण गावात पोंगे लावून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवीत आहे.तुमसर तालुक्यातील दावेझरी हे ३०० लोकसंख्येचे गाव आहे. विकास काय असतो हे येथे पोहचलेच नाही. शिक्षणाचीही अशीच अवस्था. मात्र या गावातील जय मोरे नावाच्या ध्येयवेड्या तरुणाने सॉफ्टवेअर अभियांत्रिकीची पदवी घेतली. महानगरात मोठ्या पगाराची नोकरी मिळणे शक्य होते. परंतु त्याने गाव गाठले. गावातील शिक्षणाची अवस्था पाहून मन कळवळून आले. भावी पिढी शिक्षणापासून दूर जात असल्याचे लक्षात आले. या गावातील मुलांसाठी काही तरी करायची खुणगाठ बांधली आणि जिद्द चिकाटीच्या जोरावर एका रिकामाच्या जागेवर झोपडी तयार केली. सिमेंटच्या पोत्यांचे आच्छादन घालून त्यात गावातील विद्यार्थ्यांना शिकवणे सुरु केले. ज्ञानार्जनाचे कार्य सुरू असताना कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला. परिणामी लॉकडाऊन करण्यात आल्याने जिथल्या तिथे थांबल्या गेले. फिजीकल डिस्टनसिंग, जमाव बंदी आदींच्या अडचणी वाढल्या. परिणामी शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला. लहान मुले शिक्षणापासून दूर जात असल्याचे लक्षात येताच विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोळी निर्माण करण्याच्या बेताने गावात पोंगे लावून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवीत आहे.जयच्या कार्याचे जगात झाले कौतूकप्रत्येक मुलांना अँड्रॉइड मोबाईल घेऊन देऊ शकत नाही आणि तो तरुण ही प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही, अशा परिस्थिती मध्ये जयने स्वत: पैशाने डेकोरेशन घेतले. दोन पोंगे लावले आणि शिक्षण देणे सुरू केले. या त्याच्या कार्यात गावकरी सहकार्य करीत आहेत. जय हा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची सर्व माहिती सोबतच राज्य शासन तसेच केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देऊन गावकऱ्यांचे फार्म भरून ते तालुक्याच्या ठिकाणी नेऊन गावातील लोकांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देत आहे. त्यामुळे गावकऱ्यांकरिता देवदूत ठरला आहे.जय मोरे यांच्या कार्याची दखल स्पेनच्या ‘ट्रान्सकॉन्टिनेंटल टाईम्स’ या आंतरराष्ट्रीय वृत्तसमूहाने घेतला आहे. जयने सॉफ्टवेअर अभियांत्रिकीचा पदवी अभ्यासक्रम नागपूर येथून घेतला आहे.

टॅग्स :Educationशिक्षण