शेत कुंपणात वीज प्रवाह सोडून बिबट्याची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 05:00 AM2020-07-03T05:00:00+5:302020-07-03T05:00:42+5:30

रंजित छगन रामटेके (२६) आणि चंद्रशेखर छगन रामटेके (४०) रा. खैरी पिंडकेपार असे या प्रकरणाच्या मुख्य सुत्रधार भावांची नावे आहेत. बुधवारी दुर्योधन सीताराम गहाणे, पंकज ईश्वर दिघोरे, लक्ष्मीकांत शेषमंगल नान्हे, योगेश्वर श्रीकृष्ण गहाणे यांना कातड्यासह अटक करण्यात आली होती. मार्च महिन्यात लॉकडाऊनच्या काळात शेताच्या कुंपनात वीज प्रवाह सोडून बिबट्याला ठार मारले.

Leopard hunting by leaving electricity in farm fences | शेत कुंपणात वीज प्रवाह सोडून बिबट्याची शिकार

शेत कुंपणात वीज प्रवाह सोडून बिबट्याची शिकार

Next
ठळक मुद्देपिंडकेपारचे प्रकरण : मुख्य सुत्रधार दोन भावांना अटक, आरोपींची संख्या सहा

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : बिबट्याची कातडी विकण्याच्या प्रयत्नात पोलिसांच्या जाळ्यात अडकलेल्या आरोपींनी शेत कुंपणात वीज प्रवाह सोडून शिकार केल्याचे पोलीस तपासात पुढे आले. याप्रकरणात मुख्य सुत्रधार दोन भावांना गुरुवारी पहाटे अटक करण्यात आली असून त्यांच्या घरातून बिबट्याचा जबडा जप्त करण्यात आला. आरोपींची संख्या आता सहा झाली आहे. साकोली तालुक्यातील पिंडकेपार येथे स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करुन या प्रकरणाचा पर्दाफाश केला. सहाही आरोपींना अटक करुन वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
रंजित छगन रामटेके (२६) आणि चंद्रशेखर छगन रामटेके (४०) रा. खैरी पिंडकेपार असे या प्रकरणाच्या मुख्य सुत्रधार भावांची नावे आहेत. बुधवारी दुर्योधन सीताराम गहाणे, पंकज ईश्वर दिघोरे, लक्ष्मीकांत शेषमंगल नान्हे, योगेश्वर श्रीकृष्ण गहाणे यांना कातड्यासह अटक करण्यात आली होती. मार्च महिन्यात लॉकडाऊनच्या काळात शेताच्या कुंपनात वीज प्रवाह सोडून बिबट्याला ठार मारले. दुसऱ्या दिवशी सकाळी बिबट्याच्या मृतदेह पळसाच्या झाडाखाली लपवून ठेवला. कातडी काढून वाळविण्यात आली. तसेच जबडा घरी लपून ठेवण्यात आला. दरम्यान रंजित व चंद्रशेखरने कातडी व अवयवांची विक्री करण्याचा प्रयत्न सुरु केला.
बिबट्याची कातडी विक्री करण्याकरिता काही जण ग्राहकाच्या शोधात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे यांना मिळाली. त्यांनी साकोली येथे सापळा रचला. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेशांतर करुन कातडी खरेदी करणारे ग्राहक म्हणून तेथे पाठविले. परंतु कातडी विकणारे तल्लख बुध्दीचे असल्याने वारंवार हुलकावणी देत होते. साकोली येथे वेगवेगळ्या ठिकाणी बोलावत होते. मात्र पोलिसांनी आपण खरोखरच कातडी विकत घेणारे ग्राहक असल्याचा विश्वास दिला आणि साकोली जवळील बोदरा ते पिंडकेपार रस्त्यावर बोलाविले. सहायक पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे आणि दोन कर्मचाऱ्यांना ग्राहक बनवून तेथे पाठविण्यात आले. तर पोलीस पथक त्यांच्या मागोमाग जावून दबा बसून होते. सदर कातडी तीन लाख रुपयात खरेदी करण्याचा सौदा पक्का झाला. विशेष हीच कातडी त्यांनी नागपूरच्या व्यक्तींना २० कोटी रुपये सांगून पाच कोटीत सौदा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान पोलिसांनी मोठ्या शिताफीने चौघांना अटक केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन गुरुवारी पहाटे खैरी पिंडकेपार येथे एका घरी धाड मारण्यात आली. तेथे रंजित रामटेके आणि चंद्रशेखर रामटेके यांना ताब्यात घेण्यात आले. घर झडतीत बिबट्याचा जबडा आढळून आला. त्या दोघांना अटक करण्यात आली.

आरोपी वनविभागाच्या ताब्यात
स्थानिक गुन्हे शाखेने सहा आरोपींना अटक केल्यानंतर गुरुवारी त्यांना वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. वनविभाग या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असून नागपूर येथील कोणत्या व्यक्तीला कातडे विकण्याचा प्रयत्न सुरु होता. याचीही माहिती घेतली जाणार आहे. एकंदरीत या प्रकरणाने भंडारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
१६ जुलै पर्यंत वनकोठडी
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी आरोपींना साकोली वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. त्यांनी सहाही आरोपींना साकोली प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना १६ जुलैपर्यंत वनकोठडी देण्यात आली. सहाय्यक वनसंरक्षक आर.पी. राठोड, लाखनीचे वनपरिक्षेत्राधिकारी मेश्राम, फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेंढे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. आरोपींनी यापूर्वी वन्यप्राण्यांची शिकार केली काय? कातडीची विक्री केली काय याचा शोध घेणार आहेत.

२७ लाखांचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बिबट्याची कातडी, बिबट्याचा तोंडाचा खालचा व वरचा जबडा, तीन मोटारसायकल, चार मोबाईल, स्पोर्ट बॅग असा २७ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात आणखी मुद्देमाल जप्त होण्याची शक्यता आहे.
आरोपीतील दोघे उच्चशिक्षित
बिबट्याची कातडी विक्री करताना आढळलेल्या सहापैकी दोन आरोपी उच्चशिक्षित आहेत. पैशाच्या प्रलोभनामुळे ते या प्रकरणात अडकल्याची माहिती आहे.
कुठे झाली शिकार
बिबट्याची शिकार नेमकी कधी करण्यात आली, कातडी काढण्यासाठी कुणाची मदत घेण्यात आली. अवयवांची कुठे विल्हेवाट लावली याचा तपास सुरू आहे. लवकरच सत्या बाहेर येणार असल्याचे वनविभागाने सांगितले.

Web Title: Leopard hunting by leaving electricity in farm fences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.