शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या संकटात आमदारांचा स्वखर्चातून मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 05:00 IST

व्यावसायिक उंची गाठणाऱ्या खूप कमी माणसांना सामाजिक जबाबदारी उत्तमरित्या पेलवता येते. पैसेवाले, दानशूर खूप आहेत. अनेकांनी पैशाच्या बळावर आपले बस्तान राजकारणात मांडले. पण आमदार राजू कारेमोरे यापेक्षा वेगळे ठरतात. यशस्वी उद्योजकांबरोबर दानशूर म्हणून त्यांची पूर्वीपासून ख्याती आहे. लोकांच्या मदतीला धावून जाणे ही परंपरा त्यांना त्यांच्या आईवडीलांकडून मिळाली आणि आजही ते जपत आहेत.

ठळक मुद्देगावभेटीतून जाणून घेतात समस्या : ३० हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

तथागत मेश्राम।लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : संकटकाळी लोकांच्या मदतीला धावून जाणारे व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणारे अनेक मंडळी राजकारणात आहेत. शासकीय फंडातून मदतीची रसद देऊन मोठेपणा दाखविणाऱ्यांची संख्याही कमी नाही. परंतु संकटाच्या काळात मदतीला धावून जाताना स्वत:च्या खिशात हात घालणारे क्वचित दिसतात. तुमसरचे आमदार राजू कारेमोरे हे यापैकी एक. कोरोनाच्या संकटात एक दोन नव्हे तब्बल ३० हजार कुटुंबांना तेही स्वखर्चातून मदतीचा हात दिला. आजही ते सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत गावागावात गरजवंतांना मदतीचा हात देत आहेत.व्यावसायिक उंची गाठणाऱ्या खूप कमी माणसांना सामाजिक जबाबदारी उत्तमरित्या पेलवता येते. पैसेवाले, दानशूर खूप आहेत. अनेकांनी पैशाच्या बळावर आपले बस्तान राजकारणात मांडले. पण आमदार राजू कारेमोरे यापेक्षा वेगळे ठरतात. यशस्वी उद्योजकांबरोबर दानशूर म्हणून त्यांची पूर्वीपासून ख्याती आहे. लोकांच्या मदतीला धावून जाणे ही परंपरा त्यांना त्यांच्या आईवडीलांकडून मिळाली आणि आजही ते जपत आहेत.कारेमोरे यांना राजकीय वारसा नाही. वडील उत्तम व्यावसायिक होते. त्यांच्या व्यवसायाचा गाडा समोर नेत आहेत. कमी वयात यशस्वी उद्योजकांच्या यादीत प्रथम क्रमांकाने ते ओळखले जाऊ लागले. राजकीय पार्श्वभूमी नसल्याने अनेकदा चाचपडले. विरोधकांच्या हल्ल्यात अडकले. पण हिंमत सोडली नाही. तांदूळ उद्योगात ते अनेकांचे आयकॉन झाले आहेत. त्यांच्यापासून अनेकांना प्रेरणाही मिळाली. कोरोना विषाणूच्या संकटात त्यांनी मदतीचा झंझावात सुरु केला. आपल्या विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना शासकीय मदतीपूर्वी वैयक्तिक मदत पोहचवली. संपूर्ण क्षेत्रात स्वखर्चाने सुरुवातीला भाजीपाला वाटला. अनेक कुटुंबांना अन्नधान्य व गरजेपुरते पैसेही वाटले. आवश्यक मास्क व सॅनिटायझरही दिले. जवळपास ३० हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप त्यांनी केले असून आजही ते अविरपणे मदतीचा हात देत आहेत.राजकारणी लॉकडाऊन, कारेमोरे गावागावांतकोरोनाच्या धास्तीने अनेक राजकारणी लॉकडाऊन झाले आहेत. परंतु आमदार राजू कारेमोरे आजही प्रत्येक गावागावांत जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतात. विधानसभा क्षेत्रातील सर्व दवाखाने, पोलीस ठाणे, भाजी विक्रेते यांना भेटी देत आहेत. प्रत्येक गावच्या आठवडी बाजारात ते समस्या ऐकून घेताना दिसून येतात. सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांचे दौरे अविरत सुरु असून कोरोनाच्या संकटात त्यांनी कुणालाही वाऱ्यावर सोडले नाही. आजही ते मदतीसाठी तत्पर असतात. आमदार राजू कारेमोरे यांनी लॉकडाऊनच्या काळात अख्खा मतदार संघ पिंजून काढला.

टॅग्स :MLAआमदारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस