शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बावनथडी कालव्याच्या गेटमधून पाण्याची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 05:00 IST

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर बावनथडी प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे पाणी कालव्याच्या माध्यमातून तुमसर आणि माेहाडी तालुक्याला मिळते. त्यासाठी कालव्याचे जाळे तयार करण्यात आले आहे. परंतु गत दाेन महिन्यांपासून या प्रकल्पाच्या कालव्याच्या मुख्य गेटला गळती लागली आहे. दरराेज हजाराे लीटर पाणी वाहून जात आहे. कालव्याच्या माध्यमातून पाणी शेतात पाेहाेचत आहे. सध्या शेतात मळणीचे काम सुरु असून धानाचा कळपा लावून ठेवल्या आहेत.

ठळक मुद्देशेतात पाणी शिरत असल्याने शेतकरी हतबल

  तुलसीदास रावते     लोकमत न्यूज नेटवर्कपवनारा : बावनथडी प्रकल्पाच्या मुख्य कालव्याच्या गेटमधून दाेन महिन्यांपासून पाण्याची गळती हाेत असून पाण्याचा माेठ्या प्रमाणात अपव्यय हाेत आहे. गळती झालेले पाणी कालव्यातून शेतकऱ्यांच्या शेतात शिरत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. एकीकडे शेतकरी रबी सिंचनासाठी पाण्यासाठी ओरड करीत असताना दुसरीकडे पाण्याचा अपव्यय हाेत आहे.महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर बावनथडी प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे पाणी कालव्याच्या माध्यमातून तुमसर आणि माेहाडी तालुक्याला मिळते. त्यासाठी कालव्याचे जाळे तयार करण्यात आले आहे. परंतु गत दाेन महिन्यांपासून या प्रकल्पाच्या कालव्याच्या मुख्य गेटला गळती लागली आहे. दरराेज हजाराे लीटर पाणी वाहून जात आहे. कालव्याच्या माध्यमातून पाणी शेतात पाेहाेचत आहे. सध्या शेतात मळणीचे काम सुरु असून धानाचा कळपा लावून ठेवल्या आहेत. शेतात पाणी शिरत असल्याने कळपा ओल्या हाेवून शेतकऱ्यांचे नुकसान हाेत आहे. तर दुसरीकडे अनेक शेतकरी सिंचनासाठी पाण्याची मागणी करीत आहे. कारली वितरिकेवरील गर्रा, आसलपाणी, कारली, जाेगेवाडा, चिचाेली, माेखेटाेला येथील शेतकऱ्यांनी उन्हाळी धानासाठी पाणी साेडण्याची मागणी केली हाेती. परंतु त्यांच्या मागण्याला वाटाण्याच्या अक्षदा लावण्यात आल्या. परिणामी १ नाेव्हेंबरला रस्ता राेकाे ही करण्यात आले. परंतु त्यानंतरही काेणत्याच उपाययाेजना करण्यात आल्या नाही. दुसरीकडे पाण्याचा माेठा अपव्यय हाेत आहे. या सर्व प्रकाराकडे प्रकल्प प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे. 

आंदाेलनाचा इशारा बावनथडी प्रकल्पाच्या पाण्याचा अपव्यय थांबवून उन्हाळी धान पिकाला पाणी देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. उन्हाळी पिकासाठी पाणी मिळाले नाही तर आंदाेलन करण्याचा इशारा बघेडाच्या सरपंच प्रतीमा ठाकूर, सदन चाैधरी, कृष्णकुमार रहांगडाले, ईश्वर ठाकरे, रतनलाल पारधी, राजू पारधी यांनी  दिला आहे.

टॅग्स :Bavanthadi Projectबावनथडी प्रकल्पIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प