शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
2
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
3
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
4
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
5
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
6
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
7
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
8
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; स्वत:च रचलेला हत्येचा भयंकर कट अन्...
9
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
10
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?
11
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
12
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
13
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
14
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
15
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे
16
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
17
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
18
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
19
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
20
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता

भूस्खलनाने शेकडो एकर शेती गिळंकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2022 05:00 IST

तुमसर तालुक्यातून वैनगंगा नदी वाहते. सुमारे ३९ ते ३५ किलोमीटरचा प्रवास वैनगंगा नदी तालुक्यातून करते. नदीकाठावरील रेंगे पार, उमरवाडा, बोरी, कोष्टी, बाम्हनी, चारगाव, ढोरवाडा, सुकडी(दे.) व इतर नदीकाठाच्या कडा मोठ्या प्रमाणात भूस्खलन होत आहे. काठावरील सुपीक व गाळाची शेती नदीपात्रात समाविष्ट होत आहे. अनेक शेतकरी भूमिहीन झाले आहेत. शासनाने त्यांना अजूनपर्यंत कोणताही मोबदला दिला नाही.

मोहन भोयरलाेकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील जीवनदायी वैनगंगा नदीने काठावरील शेकडो एकर सुपीक व गाळाची जमीन गिळंकृत केली आहे. परंतु शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळाला नसून शासनाने अजूनपर्यंत येथे कोणतीही उपाययोजना केली नाही. येणाऱ्या काळात नदीकाठावरील शेतजमिनीसह गावांनाही धोका येथे उत्पन्न झाला आहे.तुमसर तालुक्यातून वैनगंगा नदी वाहते. सुमारे ३९ ते ३५ किलोमीटरचा प्रवास वैनगंगा नदी तालुक्यातून करते. नदीकाठावरील रेंगे पार, उमरवाडा, बोरी, कोष्टी, बाम्हनी, चारगाव, ढोरवाडा, सुकडी(दे.) व इतर नदीकाठाच्या कडा मोठ्या प्रमाणात भूस्खलन होत आहे. काठावरील सुपीक व गाळाची शेती नदीपात्रात समाविष्ट होत आहे. अनेक शेतकरी भूमिहीन झाले आहेत. शासनाने त्यांना अजूनपर्यंत कोणताही मोबदला दिला नाही. अनेक शेतकऱ्यांना आता मजुरी करावी लागत आहे. कुटुंबाचे पालनपोषण कसे करावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.४२ हेक्टर शेतजमीन नदीपात्रात गेल्याची नोंद : शासनदप्तरी वैनगंगा नदीपात्रात आतापर्यंत केवळ ४२ हेक्टर शेतजमीन नदीपात्रात समाविष्ट झाल्याची नोंद आहे. तुमसर तालुक्यातील नदीकाठावरील अनेक गावांना याचा फटका बसत आहे. शेतजमीन ही बागायती शेती आहे. लाखो रुपयांची शेती येथे नदीपात्रात समाविष्ट होतानी येथील शेतकरी डोळ्यांने बघतात. 

सुरक्षा भिंतीची गरज- जिथे नदीने पात्र बदललेले आहे व मोठ्या प्रमाणात भूस्खलन होत आहे किमान त्या नदीकाठावर सुरक्षा भिंत बांधण्याची गरज आहे. नदीकाठावर मोठे दगड टाकून तेथे भिंत बांधल्यास भूस्खलनाच्या धोका कमी होऊन सुपीक व गाळाची शेतजमीन वाचवता येऊ शकते, परंतु त्यास राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.

रेतीउपशाचा परिणाम- तुमसर तालुक्याच्या हद्दीतील वैनगंगा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात बेसुमार रेतीच्या उपसा मागील काही वर्षांपासून करण्यात येत आहे. त्यामुळे तुमसर तालुक्याच्या हद्दीतील नदीपात्र  खोल झाला आहे. तर पलीकडे तिरोडा तालुक्यातील नदीचे पात्र हे उंच आहे.  -  ऐन पावसाळ्यात पूर आल्यानंतर पुराचे पाणी खोलगट भागातून तुमसर तालुक्याच्या हद्दीतून खळखळून वाहते. पाण्याच्या तेजप्रवाह काठावर आदळतो. नदीतील पाण्याचा प्रवाहाने पात्र बदलले काय, असे दृश्य या गावात दिसत आहे. एरवी सरळ वाहणारी नदी येथे काटकोनात वाहत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

 

टॅग्स :riverनदीagricultureशेती