चैतन्य गभणे (२९) रा. गणेशपूर असे जखमी तरुणाचे नाव आहे. तर प्रेम शेंडे (३२) रा. गणेशपूर असे आरोपी तरुणाचे नाव असून, त्याला रात्रीच भंडारा पोलिसांनी अटक केली आहे. चैतन्य आणि प्रेम काही मित्रांसोबत बाहेर जेवणासाठी गेले होते. त्याठिकाणी वाद झाला. यानंतर सर्वजण घरी निघून गेले. मात्र रात्री ११.३० वाजताच्या सुमारास प्रेमने चैतन्यला गणेशपूर ग्रामपंचायत चौकात बोलाविले. त्याठिकाणी पुन्हा वाद झाला. या वादात प्रेमने धारदार चाकूने पाठीवर आणि कंबरेवर वार केले. गंभीर जखमी अवस्थेत चैतन्यला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, रात्रीच आरोपी प्रेम शेंडे याला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. ठाणेदार लोकेश काणसे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक इंगळे तपास करीत आहेत.
गणेशपूर येथे तरुणावर चाकूहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:40 IST