महिन्याभरापूर्वी लग्न झालेल्या पत्नीवर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:42 AM2021-08-18T04:42:32+5:302021-08-18T04:42:32+5:30

पूनम गीतेश आंबागडे (२४) रा.चिंचाेली ता.माैदी असे जखमी महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती गीतेश चिंतामण आंबागडे (२९) याच्याविरुद्ध ...

Knife attack on wife who got married a month ago | महिन्याभरापूर्वी लग्न झालेल्या पत्नीवर चाकूहल्ला

महिन्याभरापूर्वी लग्न झालेल्या पत्नीवर चाकूहल्ला

Next

पूनम गीतेश आंबागडे (२४) रा.चिंचाेली ता.माैदी असे जखमी महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती गीतेश चिंतामण आंबागडे (२९) याच्याविरुद्ध गुन्हा नाेंदवून अटक करण्यात आली. महिन्याभरापूर्वी गीतेशने पहिल्या पतीपासून वेगळे राहणाऱ्या पूनमसाेबत लग्न केले हाेते. मात्र, काही दिवसांतच त्यांच्यात खटके उडायला लागले. १५ ऑगस्ट राेजी ते साकाेलीमार्गे रायपूरला जाण्यासाठी दुचाकीने निघाले. साकाेली तालुक्यातील माेहघाट जंगलात माेटारसायकल थांबविली. गीतेशने पत्नीला डाेळे बंद करण्यास सांगितले, पतीवर विश्वास ठेवत तीने डाेळे बंद केले आणि काही कळायचा आत तिच्या मानेवर डाव्या आणि उजव्या बाजूला चाकूने वार केले. जंगलात कुणीही नसल्याने आरडाओरडा करूनही उपयाेग झाला नाही. पतीच्या तावडीतून सुटका करून पूनमने साकाेली गाठले. रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली. या घटनेची तक्रार साकाेली ठाण्यात देण्यात आली. त्यावरून पाेलिसांनी तत्काळ पती गीतेश आंबागडे याला अटक केली. न्यायालयापुढे हजर केले असता, दाेन दिवसांची पाेलीस काेठडी देण्यात आली. अधिक तपास पाेलीस उपनिरीक्षक खाेब्रागडे करीत आहेत.

Web Title: Knife attack on wife who got married a month ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.